Royal politicsटॉप पोस्ट

अबब! भारतातील या राज्यात मिळणार फक्त 5 रुपयात पोटभर जेवण

0

तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर कधी डोक्याला हात लावावा लागेल असा बील आलाय का? आणि जीएसटी लागू झाल्यापासून तर विचारूच नका.  पण आपल्याच देशातील अस एक राज्य आहे जिथं लोक पोटभर जेवण अगदी 5 रुपयात करू शकणार आहेत, ते ही रोज. बसला ना धक्का! पण हे खरे आहे. जे आपल्याच देशात घडतय आणि  तेही महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी संपूर्ण राज्यात ‘अण्णा  कॅंटीन’ची योजना जाहीर केली. या योजनेत लोकांना रोज फक्त एक वेळच नाही तर दिवस भरच म्हणजेच 3 वेळच अगदी भरपेट जेवण फक्त 15 रुपयात मिळणार आहे. म्हणजे एका वेळेच्या जेवणाचे फक्त 5 रुपये.

Loading...

शेजारील राज्य असलेल्या तमिळनाडू मधील आम्मा कॅंटीन या योजनेवर आधारित आंध्रप्रदेशात अण्णा कॅंटीन ही योजना तेथील सरकारकडून आणण्यात आली आहे. ज्यात सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण असे दिवसभराचे सगळे जेवण सामान्य माणसांना फक्त 15 रुपयात मिळणार आहे.

या नाश्त्याच्या मेन्यू मध्ये इडली, उपीट, पोंगल, आणि पुरी असे पदार्थ असून, जेवणात वरण, सांभर, भात, रस्सा, आणि दही असे पदार्थ असणार आहेत. 

यात राज्य सरकारकडून राज्यभरात तब्बल 110  मतदार संघात 203 अण्णा कॅंटीन सुरू करण्यात येणार आहेत. तर पहिल्या टप्प्यात, 25 मतदार संघातील 60 अण्णा कॅंटीनचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

हे कॅंटीन चालवण्याची जबाबदारी आंध्रप्रदेश सरकारने ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ला दिली असून या अंतर्गत एका वेळी 2.15 लाख लोकांना स्वस्त आणि आरोग्यदायी अन्न अण्णा कॅंटीनमधून पुरवण्यात येणार आहे.  तसेच सरकारकडून लोकांना काही तक्रार असेल, अभिप्राय किंवा काही सूचना असतील तर ते सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आयव्हीआरएस ही यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू  हे तेलगू देसम पार्टीचे आहेत. ही योजना टीडीपी चे नेते नंदामुरी तारका रामा राव (एनटीआर) यांच्या आठवणीत राबवण्यात येणार आहे.

Loading...

महाराष्ट्रात दारूबंदी नाही? खुद राज्य सरकारचाच नकार, जाणून घ्या सविस्तर

Previous article

‘डाटा मोफत आहे, शिक्षण नाही’ – जिओ इंस्टीट्यूटच्या ट्विटर अकांऊटवरील मजेशीर ट्विट वाचून तुम्ही खळखळून हसाल

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *