Royal politicsटॉप पोस्ट

हिमाचल प्रदेश : तब्बल 50 वर्षांनी सापडला शहीद सैनिकाचा मृतदेह

0

गिर्यारोहकांच्या एका गटाला 1968 मध्ये प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू पावलेल्या एका सैनिकाचा मृतदेह सापडला आहे. हिमाचल प्रदेशच्या लाहौलमध्ये 50 वर्षापर्वी भारतीय हवाई दलाचे एएन-12 हे विमान क्रॅश झाले होते. चंदीगढवरून लेहला जाणाऱ्या या विमानात 102 प्रवासी होते.

टाईम्स आॅफ इंडियाच्या वृत्तानुसार गिर्यारोहकांच्या एका गटाला सैनिकाचा मृतदेह सापडला. त्याचबरोबर विमानाचे सुध्दा काही भाग सापडेल. हा गट चंद्रभागा-13 च्या टोकावर साफ-सफाईसाठी गेला होता. त्यांना मृतदेह आणि विमानाचे अवशेष ढाका ग्लेशियर बेस कॅंपवर मिळाले आहेत. जे समुद्र सपाटीपासून 6,200 मीटर उंचीवर आहे.

Loading...

टोकावर चढाई करण्यास गेलेल्या गटाचे प्रमुख राजीव रावत यांनी टाईम्स आॅफ इंडियाला सांगितले की, आधी विमानाचे काही अवशेष सापडले. त्यानंतर काही अंतरावर एका सैनिकाचा मृतदेह सापडला. रावत यांनी पुढे सांगितले की, आमच्या टीमने मृतदेह आणि अवशेषांचे फोटो काढले आणि ते फोटो 16 जुलै रोजी, आर्मीच्या हाय ऑल्टीट्यूड वॉरफेयर स्कूलला पाठवले. त्यानंतर आर्मीच्या अधिकाऱ्यांनी या भागात तपास मोहिम सुरू केली.

सोव्हियत संघाने बनवलेल्या या विमानात 98 यात्री आणि 4 क्रू मेंबर होते. हे विमान 7 फेब्रुबारी 1968 ला गायब झाले होते. चंदीगढपासून लेहला जात असताना खराब हवामानाची सुचना मिळताच पायलटने परत चंदीगढला जाण्याची योजना बनवली होती. रडारवरून गायब होण्याआधी या विमानाचा ठिकाणा रोहतांग च्या वरती होता.

या घटनेनंतर 35 वर्षांनी 2003 साली मनालीच्या एबीवी इंस्टीट्यूट ऑफ माउंटेनियर एंड अलायड स्पोर्ट्सच्या गिर्यारोहकांना विमानाचे काही अवशेष सापडले होते.त्यावेळेस बेली राम यांचा मृतदेह सापडला होता. बेली राम हे आर्मीमध्ये जवान होते.

तसेच आॅगस्ट 2007 मध्ये देखील सैनिकांच्या तपास पथकाला या घटनेतील तीन सैनिकांचे मृतदेह सापडले होते. 1968 मध्ये झालेल्या या घटनेत आतापर्यंत 5 मृतदेह सापडले आहेत.

Loading...

मोदींनी बहुमत जिंकले; पण राहुल गांधींनी मने जिंकली

Previous article

अरे बापरे! 100 रुपयाच्या नव्या नोटेसाठी, ‘एटीएम’वर होणार 100 कोटी रुपयांचा खर्च

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *