Royal Entertainmentटॉप पोस्ट

चीनच्या इतिहासातील 7 अब्ज रूपयांचा पहिलाच बिग बजेट सिनेमा बॉक्सऑफिसवर आपटला

0

चीनमध्ये  बिगबजेट सिनेमा म्हणून चीनच्या सरकारी चॅनल वरून जबरदस्त मार्केटिंग केल्यानंतर बॉक्सऑफिसवर आलेल्या हा सिनेमा चांगलाच आपटला. अलिबाबा पिक्चर्स  या महाकाय कंपनी हा अवाढव्य सिनेमाची निर्मिती केली आहे. चीनच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा बिगबजेट सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता.

चीनमध्ये तब्बल 766 कोटी रुपये एवढा बिगबजेट असलेला सिनेमा बॉक्सऑफिस वर दणाणून आपटल्या नंतर हा सिनेमा बॉक्सऑफिस वरून काढण्यात आला आहे. आणि यात बदल करून सिनेमा पुन्हा बॉक्सऑफिसवर आणण्याचा मानस निर्मात्यांचा आहे.

Asura-Chinese-movie
Loading...

Asura-Chinese-movie

या सिनेमाचं नाव ‘असुरा’ असून हा सिनेमा चीन मधील प्रसिद्ध असुरा या दंतकथेवर आधारित आहे. या सिनेमाला स्पेशल इफेक्ट्स देण्यासाठी करोडो रूपये खर्च करण्यात आले आहेत. यात चीनमधील अत्यंत तगडी स्टारकास्ट मंडळी असून हा जगातील इंग्लिश भाषेतर सिनेमामधील जगातील तिसरा सर्वात जास्त बजेट असलेला सिनेमा आहे.

आसुरा या सिनेमाची कथा बुद्ध परंपरेवर आधारित असलेल्या एका मेंढपाळची आहे. हा मेंढपाळ आपल्या स्वर्गासारख्या असलेल्या राज्याचे परकीय आक्रमणापासून कशी रक्षा करतो हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. 

जबरदस्त मार्केटिंग आणि अनोखे स्पेशल इफेक्ट्स असलेल्या वीकएंडला रिलीज झालेल्या या चिनी सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. वीकएंडला हा सिनेमा फक्त 48 कोटी रुपये गल्ला गोळा करू शकला. यामुळे निर्मात्यांनी हा सिनेमा बॉक्सऑफिसवरून उतरवला आहे.

चीनच्या सिनेमा निर्मितीत अग्रगण्य असलेल्या अलिबाबा पिक्चर्स, निंगशिया फिल्म ग्रुप, झेनजियान फिल्म स्टुडिओ या बलाढ्य कंपन्यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे.

हॉलिवूडचे सिनेमे चीन मध्ये भरपूर लोकप्रिय आहेत आणि चांगला गाला कमावतात. यामुळे गेम ऑफ थ्रोन्स, लॉर्ड ऑफ रिंग अशा हॉलिवूड कथानक असलेल्या सिनेमा सारखा सिनेमा निर्मिती करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला. जर चीनमधील कथेवर आधारित असलेला सिनेमा बनवला तर इथंल्या कलाकारांचा आणि तज्ज्ञांचा आत्मविश्वास वाढेल. म्हणून आम्ही हा सिनेमा तयार केला असे निंगशिया फिल्मस कडून सगळ्यात आले.

Loading...

पूजा करणे हा महिलांचा संवैधानिक अधिकार आहे आणि यासाठी कोणत्याही कायद्याची गरज नाही : सुप्रीम कोर्ट

Previous article

#खड्डयात_गेला_महाराष्ट्र ट्वीटरवर आहे ट्रेंडिंगमध्ये, जाणून घ्या का?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *