मुख्य बातम्या

राज्यातील रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

0

राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे कोरोनासोबत जगतांना अत्यंत काळजीपुर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत.
आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरु करत आहोत. व्यवहार बंद ठेवणे हा काही आवडीचा विषय असूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कर रुपात राज्य शासनाला मिळणारा महसूल ही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची शासनास जाणीव आहे म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळित करण्याचा आपला प्रयत्न आहे.
महत्वाच्या बातम्या :-
राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; वरिष्ठ नेत्यांसोबत घेतली होती बैठक
मोठी बातमी : “सगळेच आरक्षण रद्द करा आणि….” ; उदयनराजेंच खळबळजनक वक्तव्य
तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असतानाच NCBचे प्रमुख दिल्लीला रवाना !
भाजपने बदनामी केली मग त्यांच्यासोबत परत कशाला जायचे ; राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत नाराजीचे सूर
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यातील रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा InShorts Marathi.

मोठी बातमी : विश्वास नांगरे पाटील यांची शरद पवारांसोबत बैठक ; भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

Previous article

शिवसेना नेत्याचा प्रताप ; भगतसिंहाऐवजी चंद्रशेखर आझाद यांना वाहिली श्रद्धांजली

Next article

You may also like

Comments

Comments are closed.