मुख्य बातम्या

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी ठरवली रणनीती

0

मराठा आरक्षणाच्या संदर्भात रणनीती ठरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला आरक्षण विषयक मंत्रिमंडळ समितीचे मंत्री, ज्येष्ठ विधिज्ञ, अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पुढे कसं जायचं याची रणनीती ठरविण्यात आली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, राज्याचे महाधिवक्ता, विधी विभागाचे सचिव आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर चर्चा झाली. पुढील रणनितीसंदर्भात उपलब्ध कायदेशीर पर्यायांवर विचारविनिमय झाला.
यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिघी, आरक्षणाच्या बाजूने लढलेली वकील मंडळी, अभ्यासक व जाणकारांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला ; बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाली…
मुंबईत येतेय कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा ; कंगना रनौतचे खुले चॅलेंज
दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी ठरवली रणनीती InShorts Marathi.

माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली

Previous article

बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला

Next article

You may also like

Comments

Comments are closed.