Royal politicsटॉप पोस्ट

मुंबईत रहिवासी भागात चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू

0

मुंबई –

घाटकोपर परिसरातील रहिवासी भागात चार्टर्ड  विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून, अद्याप मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार पान परागच्या मालकांनी यू वाय अॅव्हिएशन कंपनीकडून हे विमान भाड्यावर घेतले होते.

Loading...

घाटकोपरमधील सर्वोदय नगर येथील बिल्डिंगला या विमानाची धडक झाली. धडक झाल्यामुळे विमानाला आग लागली. विमानामध्ये 7-8 प्रवाशी असल्याचे सांगण्यात अाले असून, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता आहे.

अग्निशमन दल आणि आपातकालीन पथक घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

विमान हे उत्तर प्रदेशच्या सरकारचे असल्याचे सांगितले जात होते. पण उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव अवस्थी यांनी नकार दिला असून, ते म्हणाले की, हे विमान  यू वाय अॅव्हिएशन कंपनीला विकण्यात आले होते.

 

Loading...

कर्नाटक सरकारला सिद्धरामय्या ठरताय डोकेदुखी? कर्नाटकातील सरकार टिकेल?

Previous article

Sanju Movie Review : खलनायक नहीं नायक हू मैं

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *