Royal Entertainmentमुख्य बातम्या

दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरीच सापडले चरस ; एनसीबीची चौकशी सुरु

0

मुंबई  – बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते; परंतु ड्रग्जप्रकरणी तिचे नाव समोर आल्यानंतर ती सोशल मीडियापासून काही काळासाठी दूर होती. आता एनसीबीच्या चौकशीनंतर  मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरीच ड्रग्ज सापडले आहेत. तिच्या घरातून  1.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळतं आहे.

Karishma Prakash (Deepika Padukone’s manager) has been summoned for investigation tomorrow: Sameer Wankhede, Zonal Director, Narcotics Control Bureau, Mumbai pic.twitter.com/P6HuWOwRm8
— ANI (@ANI) October 27, 2020

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  करिश्माला आता चौकशीसाठी पुन्हा समन्स पाठवण्यात आला आहे.  त्यांनी पुढे  सांगितलं, “करिश्मा प्रकाशला समन्स बजावलं आहे.
दरम्यान, रिया प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सच्या चौकशीत करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तिच्या घरावर छापा टाकला. तेव्हा तिच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत.
The post दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरीच सापडले चरस ; एनसीबीची चौकशी सुरु appeared first on Dainik Prabhat.

घरात लावा ओव्याचे रोप.. ‘या’ सहा मोठ्या आजारांपासून मिळेल मुक्तता..

Previous article

स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे ‘या’ दहा धोक्यांकडे दुर्लक्ष नको!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.