महाराष्ट्रमुख्य बातम्या

चंदन चोरटा अटकेत

0

सोलापूर 18 फेब्रुवारी (हिं.स)चंदनाच्या झाडाची तोड करून विक्री करणाऱ्या कुंडलिक जाधव यास रंगेहाथ पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, कुंडलिक जाधव हा मौजे चिणके (भंगार ओढा) शिवारात चंदनाच्या झाडाची तोड करीत असल्याची खबर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती.

त्यानुसार सदर ठिकाणी वनपरिक्षेत्र कार्यलय यांनी सदर ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी कुंडलिक हा कुऱ्हाडीच्या साहाय्याने चंदनाच्या झाडाची तोड करीत असताना दिसून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मौजे शिरभावी (ता.सांगोला) येथे दडवून ठेवलेला ५६६ किलो चंदनाच्या लाकडाचा साठा आढळून आला आहे.

Loading...

हस्तगत केलेला साठा जप्त करून कुंडलिक यास वनविभागाने ताब्यात घेतले व त्याच्यावर गुन्हा नोंद करून अधिक तपासासाठी अटक करण्यात आली होती.

Loading...

उमेश भोसले यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी

Previous article

पाकिस्तानी झेंडा जाळून रिक्षा युनियनने केला पुलवामा हल्ल्याचा निषेध

Next article

You may also like

Comments

Comments are closed.