खेळटॉप पोस्ट

Hockey Champions Trophy 2018: भारत आज भिडणार पाकिस्तानशी

0

हाॅकी चॅम्पियन्स ट्राॅफीला नेदरलॅंड येथे आज पासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत टाॅपचे सहा संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, आॅलम्पिक विजेता अर्जेटिंना, बेलजियम, नेदरलॅंड आणि नंबर एकवर असलेल्या आॅस्ट्रोलिया या संघाचा समावेश आहे.

ही स्पर्धा 23 जून ते 1 जूलै या दरम्यान खेळली जाणार आहे.

Loading...

भारताचा पहिला सामना हा पाकिस्तानशी आज खेळला जाणार आहे. काॅमनवेल्थ गेम मधील निराशजनक कामगिरी विसरून नव्याने सुरूवात करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. वर्ल्ड रॅंकिगमध्ये भारत 6 व्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान 13 व्या क्रमांकावर आहे.

या आधी पाकिस्तान 1978, 1980 आणि1994 अशा तीन वेळेस चॅम्पियन ट्राॅफी विजेता आहे. पाकिस्तानने तीनही विजेतेपद घरच्या मैदानावर जिंकले आहेत. भारताला एकदाही चॅम्पियन्स ट्राॅफीचे विजेतेपद मिळवता आलेले नाहीये. आॅस्ट्रोलियाने सर्वाधिक 14 वेळा चॅम्पियन्स ट्राॅफीचे विजेतेपद जिंकले आहे.

पाकिस्तान नंतर भारताचा सामना हा अर्जेंटीना (24 जून), ऑस्ट्रेलिया (27जून),बेलजियम (28 जून) आणि नेदरलॅंड (30 जून) ला होणार आहे.

मॅचची वेळ – भारत विरूध्द पाकिस्तान – संध्याकाळी 5.30(भारतीय वेळेनुसार)

लाईव्ह प्रेक्षपण – स्टार स्पोर्ट्स – 1 आणि स्टार स्पोर्ट्स – 1 एचडी

आॅनलाईन – हाॅटस्टार 

तसेच आज आणखी दोन सामने – नेदरलॅंड विरूध्द अर्जेटिना, बेलजियम विरूध्द आॅस्ट्रोलिया यांच्यामध्ये खेळले जाणार आहेत.

(PHOTO INPUT : – FACEBOOK/HOCKEYINDIA)

 

Loading...

FIFA WC 2018 : इंजुरी टाईममध्ये केलेल्या गोलने ब्राजीलची कोस्टा रिकावर 2-0 ने मात

Previous article

‘बँक ऑफ महाराष्ट्र’ प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ