टॉप पोस्ट

Column: चाचा चौधरी आणि जाहिरातबाजी

0

विकास काका ३६०

चाचा चाचा; अहो काय ऐकतोय आम्ही! ( तुम्हाला ही माहीत नसेल बहुतेक ) प्रचार रॅलीमध्ये तुम्ही खुलेआम सहभागी होताय!  तुम्ही तर आम्हाला लहान वर्गात असताना भेटायचा हो ‘चौधरी चाचा’ ( आपल्या ‘चाचा चौधरीं’ची पुस्तकं  ).

तुम्ही शिकवलेली नैतिक मूल्ये आजही लक्षात आहे बरं का आमच्या. खूप छान संस्कार केले तुम्ही आमच्यावर. बालसंस्कार केंद्राची वेळ आलीच नाही हो आमच्यावर. पण आमच्या लहान भाऊ भावंडांना कुठे आली हो ही बाल संस्कार केंद्र आणि त्यांच्या ‘मम्मी पापा’ना तरी कुठे आहे  हो वेळ ‘वीर पुरुषांच्या’ गोष्टी सांगायला. काळ बदललाय बाकी काय हो चाचा. तसं वीर पुरुष ही बदललेत म्हणा (वीर पुरुषांची व्याख्या पण बदलली हो ). आता तुम्हीच बघा.

Loading...

आता ‘सर्व शिक्षा अभियान’ राबवणार्‍या शिक्षण मंडळाने तर ‘विनोद’च केलाय, आता आमच्या लहान भावंडांना तुमची पुस्तकं वाटणारे; वाचायला! आता विनोद ऐका की, तुम्हाला साथ द्यायला ‘नमो’ जी येताय. अब ‘मन की बात होगी’ चाचा! सही जाहिरातबाजी होगी! ‘चाचा चौधरी आणि मोदी’  या नावाने शाळा शाळांमध्ये वाटप  होणारे तुमची पुस्तकं. आहे की नाही विनोद;  पण विकासासाठी विनोद नको का चाचा? त्याशिवाय आमच्या लहान भावंडांना कसे कळणार हो शूर वीरांच्या कथा?  भले की त्यातली ‘मराठी भाषे’ची स्थिति दयनीय असेल; पण संवाद  महत्वाचा, मग तो एकतर्फी  का असेना. हो की नाही? पण महत्वाचा काय, तर जाहिरातबाजी झाली पाहिजे.

म्हणतात की, लहानपणापासून केलेले संस्कार माणसच्या कायम लक्षात राहतात. म्हणून तर लहानपणापासून आपला ‘सुपर हीरो’ लहान मुलं शोधत असतात. क्रेझ असते हो चाचा सुपर हीरो ची. जरी आमच्या लहान लेकरांना, भाऊ भावंडांना हा प्रोपगंडा  समजत नसला तरी त्यांच्या मम्मी पप्पा ना कळतो ना हो. याआधी तुम्हीच जागृत  केल तुमच्या पुस्तकातून योग्य अयोग्यतेचे धडे  देऊन आम्हाला.. त्यासाठी खरोखर धन्यवाद हो चाचा. बाकी जाहिरातबाजीच माध्यम  छान शोधलं बरं का चाचा.

 

Loading...

विरोधी पक्ष सक्षम नाही हेच भाजपचे यश

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *