Royal politicsटॉप पोस्ट

J&K:- दहशतवादी विरोधी कारवाया थांबवल्यानंतर देखील दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण वाढले

0

जम्मू काश्मीर:-

जम्मू काश्मीरमध्ये सरकार कडून या वर्षी रमजान महिन्यात  सैन्यदलाला दहशतवादी विरोधी कारवाया थांबवण्याचे आदेश दिले होते. त्या नुसार सुरक्षा दलाकडून 17 मे पासून 17 जून दरम्यान  दहशतवादी विरोधी कारवाया पूर्णपणे थांबवल्या होत्या. परंतू असे असले तरीही जम्मू काश्मीरमध्ये या काळात दहशतवादी कारवाया काही कमी झाल्या नाही.

Loading...

मागील 1 महिन्यात दहशतवाद्यांकडून झालेले हल्ले 

17 मे ते 17 जून या काळात राजनाथ सिंह यांनी रमजान महिन्याचा विचार करता जम्मू काश्मीरमधील दहशतवादी विरोधी कारवाया थांबवण्याचे आदेश सैन्यदलाला देण्यात आले होते. यामुळे रोज होणारे हल्ले कमी होतील अशी अपेक्षा जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केली होती. परंतू या महिन्यातदहशतवाद्यांकडून तब्बल 41 हल्ले करण्यात आले.

यात पत्रकार सुजात बुखारी यांची ईदच्या दोन  दिवस आधी दहशतवाद्यांकडून भ्याड हत्या करण्यात आली, तर ईदसाठी घरी येत असलेल्या जवान औरंगजेब यांची देखील दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करून हत्या करण्यात आली.

याच महिन्यात सेना आणि सीआरपीएफचे जवळपास 9 जवान शहीद झाले आहेत. तर 60 दगडफेकीच्या घटना घडल्या. मागील वर्षी रमजानच्या महिन्यात 200 दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या.

रमजान महिन्यात 20 ग्रेनेड हल्ले 

रमजान महिन्यात गेल्या 1 महिना थांबण्यात आलेल्या दहशतवादी विरोधी कारवाया दरम्यान दहशतवादी संघटनांकडून  तब्बल 20 ग्रेनेड हल्ले  करण्यात आले. यात 60 च्या वर सामान्य नागरिक घायाळ झाले आहेत. लष्कर-ए- तैयबा, जेश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहुद्दीन यांसारख्या संघटनांकडून असे हल्ले केले जात असल्याचे समोर येत आहे.

केंद्र सरकारने दहशतवादी विरोधी कारवाया करण्यावरील प्रतिबंध हटवले   

गेल्या महिन्याभरात थांबवण्यात आलेल्या दहशतवादी विरोधी कारवायांवरील प्रतिबंध केंद्र सरकारकडून हटवण्यात आले आहे. रविवारपर्यंत              फक्त एक  महिन्यात दहशतवाद्यांकडून 41 जणांच्या हत्या, 20 ग्रेनेड हल्ले, 50 दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. काश्मीर खोर्‍यात आता केंद्रकडून अधिक मोठ्या प्रमाणात दहशतवादी विरोधी करवाया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये ‘मिशन ऑल आऊट’ला सुरुवात करण्यात आल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

Read This News Also-

1992 ते 2018 मध्ये भारतात 47 पत्रकारांची हत्या, तर जम्मू -काश्मीरमध्ये 19 पत्रकारांची हत्या

Loading...

OPINION : हू किल्ड द प्रेस ?

Previous article

कर्नाटकमध्ये जर एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्याला पंतप्रधान मोदी कसे जबाबदार असतील?-प्रमोद मुतालिक

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *