मुख्य बातम्या

हे बोलून फडणविसांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केलंय ; काँग्रेसची घणाघाती टीका

0

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली, ज्यांच्या १० वर्षाच्या काळात भारताचा सरासरी विकास वाढीचा दर ७.५ टक्के राहिला त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऐतिहासिक विकास दर गाठला एवढेच नव्हे तर त्या विकासाचा उपयोग हा जनहितासाठी करुन १४ कोटी दारिद्र्य रेषेखाली असलेल्या जनतेला गरिबी रेषेच्या वर आणले. यातून नवीन सकारात्मक आर्थिक वर्गवारी देशाला पहायला मिळाली.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 19, 2020

याच तिमाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने जीडीपीच्या अधोगतीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि रसातळ काय असतो याची ओळख मोदींनी स्वतःच देशाला पटवून दिली आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :-

पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड
मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर मंदिरं उघडली असती ; भाजपचा आरोप
भाजपच्या पोटात आहे तेच कंगनाच्या मुखात,छत्रपतींची जनता यांना माफ करणार नाही – बाळासाहेब थोरात
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. हे बोलून फडणविसांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केलंय ; काँग्रेसची घणाघाती टीका InShorts Marathi.

लॉकडाऊनमुळे देशात तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार , वाचा धक्कादायक माहिती

Previous article

मोठी बातमी : ABCD सिनेमातील ‘या’ अभिनेत्याला ड्रग्सप्रकरणात अटक !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.