Royal politicsटॉप पोस्ट

बुराडी मृत्यूकांड:- सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुटुंबच करतय आपल्या आत्महत्येची तयारी

0

दिल्ली:-

दिल्लीतील बुराडी मृत्यूकांडाप्रकरणी रहस्यमय घटना समोर येत असताना आता या 11 जणांच्या मृत्यूप्रकारांनी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरण संबंधीचे काही सीसीटीव्ही फुटेज आता दिल्ली पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Loading...

या प्रकरणात मृत्यूचे गूढ असलेल्या 2 डायऱ्या हाती लागल्या नंतर आता काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. या फुटेज जे काही दिसते आहे त्यावरून या सर्व प्रकरणात कोणीही सहभागी असल्याचे तरी दिसून येत नाही. कारण या फुटेजमध्ये घरातील सद्स्य आपल्याच आत्महत्येची तयारी करताना दिसून येत आहे. आणि हे सीसीटीव्ही फुटेज या सामूहिक आत्महत्येच्या आदल्या रात्रीचे आहे.

काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये-  

हाती लागलेल्या या सीसीटीव्ही फुटेज भाटिया कुटुंबाच्या घराजवळील आहे. या सीसीटीव्ही फुटेजमधील व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, एक महिला आपल्या मुलीसोबत आणि दोन लहान मुलांसोबत घरी काही काळे स्टूल आणि वायर घेऊन जाताना दिसत आहेत. ही दृश्य कुटुंबाच्या आत्महत्येच्या काही तास आधीची आहेत. या नंतर अगदी काही तासाने म्हणजे रात्री 1 वाजता या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. यावरून असे दिसते आहे की कुटुंबाबरोबर कोणतीही जोरजबरदस्ती करण्यात आली नाही. हा सर्व प्रकार अंदाश्रद्धेला बळी गेल्यामुळे झाला आहे.

या सोबतच पोलिसांना 11 वर्षात 11 लिहिलेल्या डायऱ्या सापडल्या आहेत. यात 2007 मध्ये कुटुंब प्रमुख भोपल सिंह यांच्या मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा ललित याच्या स्वप्नात त्यांचे वडील म्हणजे भोपल सिंह येत आणि ते त्याला आदेश देत. वडिलांनी दिलेले आदेश ललित डायऱ्यांमध्ये लिहीत असत. असे गेल्या 11वर्षापासून लिहिलेल्या डायऱ्या पोलिसांना मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे आत्महत्येच्या शेवटच्या दिवसापर्यंत या डायरीमध्ये लिहिले आहे. आणि त्यानुसार निर्णय घेऊन हे लोक वागत असत.

डायरीमध्ये लिहिल्याप्रमाणे हे कुटुंब आपल्या सुखासाठी आणि परिवाऱ्याच्या उन्नतीसाठी असे प्रकार करत असे. हे लोक 24 जून पासून 30 जूनपर्यंत रोज वडाची पूजा असलेला प्रकार घरी 7 दिवसांपासून करत होते. पूजेच्या शेवटच्या दिवशी त्यांना वडाच्या झाडाला असलेल्या परंब्यांप्रमाणे त्यांना लटकायचे होते.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा आत्महत्या करण्याचा हेतू नव्हता. वडाची तपस्याकरून त्यांना त्यांचे कुटुंबाचे सुखी करायचे होते. परंतू त्या प्रयत्नात त्यांना आपला जीव गमवावा लागला.

Loading...

Video:-बुलेट ट्रेनच्या नावाखाली सरकारची चेष्टा करणार्‍या वायरल व्हिडिओचे हे आहे सत्य!

Previous article

भारतात सर्वात जास्त इंस्टाग्राम फाॅलोवर्स आहेत या व्यक्तीला, नरेंद्र मोदींना देखील टाकले मागे

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *