Royal politicsटॉप पोस्ट

बुराडी मृत्यूकांड- 11 जणांच्या मृत्यूचे गूढ ‘डायरी’मध्ये; जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

0

नवी दिल्ली (बुराडी):-

नवी दिल्लीमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे जी आपल्या मनाला हलवून ठेवेल. नवी दिल्लीच्या बुराडी येथे रविवारी सकाळी गळफास लावलेल्या अवस्थेत एकाच कुटुंबातील ११ व्यक्तींचे मृतदेह आढळले. एकाच वेळी संपूर्ण कुटुंबाच अस्तित्व नाहीस झाल्याने या घटनेची दिल्ली पोलीस कसून चौकशी करीत आहेत. हे मृत्यू अंधश्रद्धेतून झाले असावे असा संशय आहे.

Loading...

घरातील संपूर्ण कुटुंबानेच एका वेळी स्वताला गळफास लावून घेतल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. असे असले तर संपूर्ण कुंटुंबाला स्वतहून असे करण्याची वेळ नक्की आलीच कशी असा प्रश्न आहे. या घरात आणि घरच्या आसपास अनेक संशयास्पद घटक आढळून आले आहेत. जसे की घराबाहेर भिंतीला दिसत असलेले 11 पाईप.  ज्यावरून असा अंदाज बांधला जात आहे की हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असावा.

या प्रकरणात अकरापैकी दहा जणांचा मृत्यू फास लावून घेतल्यानेच झाल्याचे पोस्टमार्टेमवरून निष्पन्न झाले आहे. कारण यातील ७७ वर्षीय वृद्ध महिला नारायण देवी यांचा मृतदेह जमिनीवर होता. परंतू पोलीस तपासात आता स्पष्ट झाले आहे की, या वृद्ध महिलेच्या मृतदेहाजवळ दोरखंड सापडला आहे, यावरून असे स्पष्ट झाले आहे की त्यांचा मृत्यू अर्धवट गळफास लावल्याने झाला.

नातेवाईक म्हणतात की, ही काही आत्महत्या नाही-

वृद्ध महिलेची मुलगी सुजाता नागपाल हिने संगितले की, “मी दिवसाआड आईला फोन करत असे. आई सांगायची की घरात सर्व काही ठीक आहे. हे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते आणि त्यांचा कोणत्याही बाबावर किंवा अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. त्यामुळे ही काही आत्महत्या असू शकत नाही. असे सांगत त्या पुढे म्हणल्या की, प्रसारमाध्यमांकडून आत्महत्येचे कारण देऊन चुकीचे वृत्त प्रसारित केले जात आहे.”
मृत वृद्धेची पुतणी गीता ठुकराल यांच्या सांगण्यानुसार मागील महिन्यात प्रियांका (घटनेतील मृत व्यक्ती) हिचा साखरपुडा झाला होता. आणि आमचे कुटुंब इतर कुटुंबा प्रमाणेच धार्मिक होते. कोणाचाही अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता.

आत्महतेचे गूढ ‘डायरी’मध्ये?

पोलिसांना घटना स्थळी दोन डायर्‍या मिळाल्या आहेत, ज्यात मृत्यूनंतर मोक्ष कसा मिळवावा याबाबत मजकूर लिहिलेला आहे. तसेच धार्मिक विधी कसे करायचे आणि ते करताना कुटुंबातील इतर सदस्यांनी काय काय नियम पाळायचे हे या डायरीमध्ये लिहिले आहे.

या डायरीमध्ये पुढील लिहिलेला मजकूर अत्यंत संशयास्पद आहे. यात असे लिहिले आहे की, डोळ्यांना पट्टी बांधायची, शून्य शिवाय काहीही दिसायला नको, दोरखंडा बरोबर सूती ओढण्या आणि साड्यांचा वापर करायचा आहे. सात दिवस घरात सतत पुजा करायची आहे.

सर्व मृतदेहांच्या डोळ्यांवर एकाच बेडशीटच्या फाडलेल्या पट्टय़ा बांधलेल्या आहेत. तोंडावर चिकटपट्टी देखील लावल्या आहेत. तसेच घटनास्थळी काही चिठ्ठय़ा सापडल्या आहेत. या चिठ्ठीत असे देखील लिहिले आहे की; यातील एक जण मरणार नाही, तो काही तरी महान साध्य करेल. यावरून हे स्पष्ट होत आहे की, या कुटुंबाने कदाचित धार्मिक श्रद्धेपाळी आत्महत्या केली आहे.

Loading...

सर्वोच्च न्यायालयाच्या 23 न्यायाधीशांपैकी केवळ 12 न्यायाधीशांची संपत्ती जाहीर

Previous article

ही बातमी वाचून तुम्ही जीमेल वापरणं बंद कराल

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *