Royal politicsटॉप पोस्ट

Video:-बुलेट ट्रेनच्या नावाखाली सरकारची चेष्टा करणार्‍या वायरल व्हिडिओचे हे आहे सत्य!

0

सध्या बुलेट ट्रेनची देशात बरीच चर्चा चालू आहे. त्याच्या जाहिरातबाजीवर सरकार कितीतरी खर्च करते आणि  अनेक बातम्यांमधून बुलेट ट्रेनची वहा-वहा ऐकत असतो. अशीच एक खूप दिवसांपासून सोशल मीडियावर वायरल होणारी पोस्ट फिरत आहे. जी मोदींचा अत्यंत महत्वकांशी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनविषयी आहे. ज्यात लोक रेल्वेच्या टपावरून एका खांबाच्या आधारे खाली उतरत आहे. या वायरल होणार्‍या व्हिडिओ मधील काही फोटो आणि व्हिडिओ तुम्ही पाहाल तर तुम्ही देखील चकित व्हाल.

Loading...

ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लमीन (facebook page)  

या व्हिडिओ च्या खाली लिहिले आहे की, ‘बुलेट ट्रेनमधून उतरणारे डिजिटल इंडियाचे लोक’. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. पहिल्यांदा पाहताना ही ट्रेन उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील असल्याचे वाटते. कारण आज देखील तिथे ही परिस्थिती आहे.

परंतू या वायरल होणार्‍या व्हिडिओची सत्याला तपासली असता, ही दृश खरी असली तरी ही काही भारतातील नाही. या व्हिडिओमध्ये दिसत असलेली ट्रेन च्या टपावरून खांबाच्या आधारे उतरणारे लोक हे भारतीय असल्याचे वाटतात, त्याचे कपडे देखील भारतीय लोकांसारखे वाटतात. परंतू ट्रेनमधून खाली उतरण्याची ही कसरत बांगलादेशमधील ट्रेनची आहे.

कारण थोडे नीट लक्ष देऊन पहिले तर कळते की, या ट्रेनचा रंग हा हिरवा आणि पिवळ्या पाट्या असलेल्या आहे, आणि त्यावर दिसणारी भाषा ही बंगाली आहे. असा रंग आणि बंगाली भाषा बांगलादेशातील ट्रेनवर वापरली जाते.

या वायरल झालेल्या व्हिडिओ ची जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा हा व्हिडिओ बांगलादेशमधील फेसबूक अकाऊंट वरून वायरल होत भारतात शेअर होत पोहचला आहे.  हा व्हिडिओ पहिल्यांदा फेसबूक अकाऊंट वर टाकणार्‍याचा शोध घेण्यात आल्यावर कळले की, रुबायत तनवीर अन्नान या व्यक्तीने आपल्या फेसबूकवर ही पोस्ट शेर केली आहे. आणि ही व्यक्ती बांगलादेश येथील असून ही व्यक्ती बंगलादेशच्या सैन्य अकादमीमध्ये आहे. त्यांनी हा व्हिडिओ 22 जूनला आपल्या टाइम लाइन वर शेअर केला होता. 31 लाख पेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट पहिली आहे आणि 55 हजार वेळा ही व्हिडिओ लोकांकडून शेअर करण्यात आली आहे. अशाप्रकारे वायरल होत ही पोस्ट भारतमध्ये येऊन पोहचली आहे.

आपण सोशल मीडियावर रोज कितीतरी पोस्ट शेअर करतो. तेही कोणत्याही सत्याची खात्री न करता. त्यामुळे याबाबत थोडी सावधगिरी बाळगूनच अशा पोस्ट शेअर कराव्या.

(video- facebook)

Loading...

‘आप’ने राखले दिल्लीचे तख्त, सर्वोच्च न्यायालयाचा ‘दिल्ली’बाबत महत्वपूर्ण निर्णय

Previous article

बुराडी मृत्यूकांड:- सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुटुंबच करतय आपल्या आत्महत्येची तयारी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *