Royal politicsभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

प्रिया दत्त यांच्या जागी ‘या’ अभिनेत्रीला देणार कॉंग्रेस उमेदवारी

0

मुंबई – माजी खासदार प्रिया दत्त यांना पक्षाच्या सचिवपदावरून काढून टाकल्यानंतर आता दत्त यांनी आणखीन एक धक्का कॉंग्रेस देणार असल्याची चिन्हे आहेत2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील लोकसभेच्या उत्तर मध्य मतदारसंघातून प्रिया दत्त यांच्याऐवजी अभिनेत्री नगमा यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री नगमा यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये काँग्रेससाठी अनेक रोड शो केले आहेत. दरम्यान, रविवारी झालेल्या काँग्रेसच्या मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातील पक्षाच्या बैठकीत नगमा उपस्थित राहिल्याने शक्यता आणखी बळावली आहे.

Loading...

कोण आहेत प्रिया दत्त ?

सुनील दत्त यांच्या कन्या असलेल्या प्रिया दत्त यांनी या मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला होता. सुनील दत्त यांच्या निधनानंतर 2005 साली झालेल्या पोटनिवडणुकीत आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र 2014 साली त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Loading...

म. गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधत राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींवर साधला निशाणा

Previous article

अण्णांच्या ९० टक्के मागण्या पूर्ण : महाजन

Next article

You may also like

Comments

Comments are closed.