खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : इंजुरी टाईममध्ये केलेल्या गोलने ब्राजीलची कोस्टा रिकावर 2-0 ने मात

0

21 व्या फिफा वर्ल्ड कपमध्ये ई ग्रुपमधील आजच्या मॅचमध्ये ब्राजीलने कोस्टा रिकाचा 2-0 असा पराभव केला. ब्राजीलतर्फे फिलीप काॅन्टिनियोने 91 व्या मिनिटाला गोल करत ब्राजीलला आघाडी मिळवून दिली.  ब्राजीलचा स्टार खेळाडू नेमार यानेही 97 व्या मिनिटाला गोल करत 2-0 ने संघाला विजय मिळवून दिला.

मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. ब्राजीलचा खेळ आक्रमक होता पण कोस्टा रिकाने त्यांना एकही संधी दिली नाही.

Loading...

ब्राजीलच्या खेळाडूंचे संपुर्ण सामन्यावर वर्चस्व होते. त्यांचा खेळ कोस्टा रिका पेक्षा अधिक आक्रमक होता. सामना बरोबरीत सुटतो की काय असे वाटत असताना,  शेवटच्या इंजुरी मिनिटमध्ये फिलीप काॅन्टिनियोने व नेमारने गोल करत संघाला विजय मिळवून दिला.

सामन्यावरील ब्राजीलचे वर्चस्व पासेस वरूनच स्पष्ट होते. त्यांनी संपुर्ण मॅचमध्ये तब्बल 400 पेक्षा अधिक पासेस केले तर कोस्टा रिकाने 200 पेक्षा अधिक केले.

संपुर्ण सामन्यात ब्राजीलचे  68 % बाॅलवर वर्चस्व होते तर कोस्टा रिकाचे  32 % वर्चस्व होते.

रविवारी झालेल्या सामन्यात ब्राजीलला स्विर्झलॅंडने 1-1 असे बरोबरीत रोखले होते.

Loading...

न्यूज 18, फर्स्ट पोस्ट, टाइम्स नाऊ, न्यू इंडियन एक्सप्रेस यांनी अमित शाह यांच्या ‘त्या’ बातमीबाबत घेतली माघार

Previous article

Hockey Champions Trophy 2018: भारत आज भिडणार पाकिस्तानशी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ