Royal Entertainmentटॉप पोस्ट

TRAILER : हॉकी लेजेंड संदीप सिंगच्या आयुष्यावरील ‘सूरमा’चा ट्रेलर रिलीज

0

तापसी पन्नू व दलजीत दोसांजची प्रमुख भुमिका असलेल्या ‘सूरमा’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. भारतीय हाॅकी टिमचा माजी कॅप्टन संदीप सिंगच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे.

संदीप सिंगची भुमिका दलजीत दोंसाज करणार असून तापसी त्याच्या प्रेयसीच्या भुमिकेत दिसणार आहे. हाॅकी खेळण्यासाठीचे प्रेम, देशप्रेम, प्रेयसीवरील प्रेम अश्या अनेक गोष्टी प्रेक्षकांंना या सिनेमात बघायला मिळणार आहेत.

Loading...

या चित्रपटातून संदिप सिंगच्या आयुष्यातील अनेक पैलू समोर येणार आहेत. प्रेयसीसाठी हाॅकी खेळणे असेल की 2006 साली गोळी लागल्यामुळे प्यारेलाईजिड होणे असेल आणि पुन्हा हाॅकीसाठी संघात कमबॅक करणे असेल अशा अनेक गोष्टी ट्रेलरमध्ये दिसून येतात. हाॅकीचे एका वेगळे जग आपल्याला या ट्रेलरमधून बघायला मिळते.

तापसी पन्नू व दलजीत दोसांज हे दोघेही या चित्रपटात हाॅकीपटूच्या भुमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे आणखी एका नवीन जोडीला वेगळ्या रूपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तसेच या चित्रपटात अंगद बेदी सुध्दा मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाला शाद अली याने डायरेक्ट केले आहे. शाद अलीने या आधी ‘बंटी और बबली’ तसेच ‘ओके जानू’ या सारख्या चित्रपटांचे डायरेक्शन केले आहे. तसेच या चित्रपटाला शंकर-एहसान-लाॅय यांनी संगीत दिले असून सोनी पिक्चर नेटवर्कसचे प्रोडक्शन आहे.

‘सूरमा’ हा येत्या 13 जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(PHOTO INPUT :- YOUTUBE)

Loading...

SCO: शांघाय सहकार्य परिषदेमध्ये भारताचा ‘बीआरआय’ला विरोध

Previous article

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला पाहिजे ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय – रिपोर्ट

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *