मुख्य बातम्या

#बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन – ‘दारू मी निवडलेलं ड्रग होतं’ , पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा

0

एकिकडे बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची नावं समोर येत असतानाच दुसरीकडे लोकप्रिय अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट हिनं अत्यंत मोठा आणि तितकाच महत्त्वाचा खुलासा केला आहे.
इन्स्टाग्रामवरील प्रायव्हेट अकाऊंटवरुन पूजानं तिच्या वैयक्तित जीवनातील अत्यंत महत्त्वाचा काळ सर्वांपुढं मांडला आहे. हा काळ तेव्हाचा आहे, जेव्हा मद्याच्या नशेत धुंद असणाऱ्या पूजानं यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून परिस्थितीला मोठ्या धीरानं आणि संयमानं तोंड दिलं होतं. आपल्या जीवनातील आव्हानात्मक काळाबाबत सांगताना हा मुद्दा असा जाहीरपणे मांडण्यामागचं कारणंही तिनं स्पष्ट केलं आहे.
सोशल मीडिया पोस्टमधून अतिशय संवेदनशील मुद्द्यावर भाष्य करत पूजानं लिहिलं, ‘तीन वर्षे नऊ महिन्यांपासून आजपर्यंत सोबर. आणखी तीन महिने नंतर मग चार वर्षे होणार. जसं कोणी एक अगदी मोकळेपणानं मद्यप्राशन करतं, त्याचप्रमाणं मी तितक्याच मोकळेपणानं या नशेतून सावरतेय. मला वाटत होतं, की माझा प्रवास इतरांपर्यंत विशेष म्हणजे महिलांपर्यंत पोहोचवत त्या एकट्या नाहीत हे सांगावं. जर मी हे करु शकते, तर तुम्हीही ते करुच शकता’.

मद्यप्राशन करणं हा सर्वस्वी आपला निर्णय होता, असं सांगत तिनं लिहिलं ‘दारू हेसुद्धा एक प्रकारचं ड्रगज झालं आणि ते मी निवडलेलं ड्रग होतं. दारु बहुतांश समाजात सर्वमान्य आहे याचा अर्थ असा नाही की ते ड्रग नाही. मला मागील काही वर्षांत दारू पिण्यापेक्षा दारु न पिण्यासाठी किंवा मद्यप्राशन न करण्यासाठी अनेक कारणं द्यावी लागली’. हा वैचारिकदृष्ट्या मोडकळीस आलेला समाज तेव्हाच सावरेल जेव्हा सातत्यानं कोणाबाबत पूर्वग्रह बांधणं बंद होईल असं सूचक वाक्य तिनं या पोस्टमध्ये लिहिलं.

महत्वाच्या बातम्या :-

निलेश राणेंच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही ; विनायक राऊतांचा घणाघाती हल्ला
मराठा समाज आक्रमक ! १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक !!
कोरोनामुळे मतदारसंघातील यंदाचा नवरात्रोत्सव जितेंद्र आव्हाडांकडून रद्द !
कोरोना संकट काळात शरद पवार मदतीला धावले ; केली ‘ही’ मोलाची मदत
‘काँग्रेस का हात दलालों के साथ’ ; कृषी विधेयकावरुन भाजपचा घणाघात
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. #बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन – ‘दारू मी निवडलेलं ड्रग होतं’ , पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा InShorts Marathi.

धक्कादायक : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन !

Previous article

मुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला ; केली ‘ही’ मागणी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.