टॉप पोस्टराजकारण

अखेर भाजप-पीडीपीचा काडीमोड, जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीची शक्यता

0

भाजपने जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीचा (पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी) पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर मधील सरकार अल्पमतात आले आहे. भाजपचे  अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी जम्मू काश्मीरमधील भाजपच्या नेत्यांशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  ईदनंतर दहशतवादी विरोधी कारवाया चालू करण्यावर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होते.

तीन वर्षापुर्वी 2015 मध्ये भाजप व पीडीपीची सरकार बनले होते. भाजपने पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपालांना पाठवले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची देखील मागणी भाजपने केली आहे.  भाजपने पाठिंबा काढल्याने जम्मू काश्मीरमधील पीडीपीचे सरकार अडचणीत आले आहे. तसेच मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या संध्याकाळी राजीनामा देऊ शकतात.

Loading...

राम माधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ते म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. फ्रीडम आॅफ स्पिचचे पण स्वतंत्र्य राहिले नाहीये. काही दिवसापुर्वी झालेल्या शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

ते म्हणाले की, जम्मू – काश्मीरमध्ये आम्हाला शांती पाहिजे, म्हणून केंद्र  सरकारकडून जम्मू-काश्मीरसाठी 80 हजार करोडचे पॅकेज देण्यात आले होते.

तसेच पक्ष अध्यक्ष अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

सद्य स्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीच्या 28, भाजपच्या 25, नॅशनल काॅन्फरंसच्या15, काॅंग्रेसच्या 12 व इतर 7 जागा आहेत.

 

माजी मुख्यंत्री ओमर अबदुल्ला यांनी  ट्विट करत म्हटले की, म्हणुन हे झालं.

Loading...

पाकिस्तानकडे आहेत भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे

Previous article

मेहबूबा मुफ्तींचा राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *