Royal politicsटॉप पोस्ट

अमित शहा घेणार उद्धव ठाकरे यांची भेट, युतीसाठी तडजोड

0

भाजप शी युती करण्याच्या मुद्यावर उद्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा; शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. याआधी भाजपचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठींबा देण्यात यावा यासाठी मागील जून महिन्यात १ वर्षांपूर्वी त्यांची भेट झाली होती.

भाजप आणि आणि मित्र पक्ष

Loading...

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी मध्ये सामील झालेला शिवसेना पक्ष आता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करीत आहे. तसे इशारे ही शिवसेना प्रमुखांकडून आपल्या वक्तव्यातून दिले जात आहेत.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी मधील लोकसभा निवडणुकीत भाजप नंतर सर्वात जास्त जागा जिंकलेला हा २रा मोठा पक्ष आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला महाराष्ट्रातून १८ जागा मिळाल्या होत्या. त्यासाठी भाजप कडून शिवसेनेशी युती देखील करण्यात आली होती. भाजप ने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 23 जागा मिळाल्या होत्या. या पाठोपाठ तेलगू देसम पार्टी (आंध्रप्रदेश) (१६ जागा), लोक जनशक्ति पार्टी (बिहार) (६ जागा) अशा आणि इतर मित्र पक्षांना मिळून २८२ एवढ्या जागा भाजप ला मिळाल्या होत्या.

भाजप आणि शिवसेनातील कुरबुर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत सतत कुरबुर चालू आहे. भाजपच्या प्रत्येक निर्णयावर(नोटबंदी,जीएसटी,जलयुक्त शिवार,नाणार प्रकल्प,कर्जमुक्ती), वक्तव्यावर ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून सतत हल्ला चढवण्यात येतो, विरोध करण्यात येतो. सामनातून मोदी आणि भाजप वर सतत प्रहार करण्यात येत असल्याने भाजपकडून सांगण्यात येते तर भाजप कडून मित्रपक्षांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतो. सेनेकडून भाजप ला सर्वात मोठा शत्रूपक्ष म्हंटले जात आहे.

भाजप ला आता मित्र पक्षांची गरज नाही असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. आता झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. यात शिवसेनेला अपयश आले असले तरी या पुढे शिवसेना स्वबळावर लढेल असे उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांची वक्तव्य

  1. पालघर लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून मोदींना निशाणा बनवण्यात आला होता. “ पंतप्रधान सतत देशाबाहेर असतात,आणि देश बदलला असल्याचे सांगतात.ते फक्त निवडणुकीच्या काळात देशात येतात,पण एकदा का निवडणूक झाली की पुन्हा बाहेर जातात.”
  2. एप्रिल महिन्यात देखील यांनी मोदींवर निशाणा साधला. “मी मोदींसारखा हुकूमशहा नाही. मी मोदींचा विरोधक नाही, पण मला ज्यावेळी मोदी सरकारचे निर्णय पटणार नाही त्यावेळी मी बोलणार.”
  3. शिवसेना ही पहिला पक्ष आहे ज्याने हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकली,आमचा पहिला आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर जिंकून आला. त्यानंतर इतरांना जाणीव झाली की हिंदुत्व हा राजकीय मुद्दा आहे. मागील २५ वर्ष आपली युती हिंदुत्वाच्या मुद्यावर आहे, पण अच्छे दिन आल्यावर शिवसेना नकोशी झाली हे माला जास्त दुखवणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्षांचे वक्तव्य

  1. पालघर पोटनिवडणूक विजयानंतर पदाधिकारी बैठकीत “शिवसेनेशिवाय आम्ही निवडणुका जिंकू शकतो, शिवसेना सोबत असो आगर नसो आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
  2. युती एका बाजूने होत नाही, ती दोन्ही बाजीने व्हायला हवी. पोटनिवडणुकीत आमची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे. तरीही शिवसेनेसोबत जाण्याची आमची इच्छा आहे, मात्र सेंनेकडून प्रतिसाद मिळाला तर ठीक नाहीतर आम्ही आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे असे वक्तव्य प्रदेश अध्यक्ष दानवे यांच्याकडून करण्यात आली.

अशा सतत घडणार्‍या शाब्दिक युद्धमुळे भाजप शिवसेना याच्या युतीत कडूपणा आला आहे. शिवसेनेकडून देखील स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला जात आहे. एनडीए मधील मित्र पक्ष असलेला तेलगू देसम पार्टी देखील एनडीए मधून वेगळा झाला आहे. शिवसेना आणि भाजप मध्ये सतत प्रत्यारोपच्या फेर्‍या झाडल्या जात असल्या तरी भाजपकार्यकारणीला  सध्या तापलेल्या राजकीय वातावरणामुळे शिवसेनेशी युती करणे गरजेचे वाटत आहे. याशिवाय एनडीए मधील इतर मित्र पक्ष नाराज आहे. यामुळे २०१९ च्या निवडणुकांचा विचार करता अमित शहा नाराज मित्र पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी गाठीभेटी घेत आहे.

‘संपर्क फॉर समर्थन’ या कार्यक्रमासाठी ते मुंबई येणार आहेत. यावेळी ते उद्धवठाकरे यांची भेट घेतील. त्या नंतर ते चंदिगडला अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाशसिंग बादल यांची भेट घेणार आहेत.

Loading...

गुजरातमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात, पायलटचा मृत्यू

Previous article

रजनीकांतचा ‘काला’ अडकला वादात, मानहानीचा दावा दाखल

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *