टॉप पोस्टट्रेंडिंगमहाराष्ट्रमुख्य बातम्याराजकारण

मोठी बातमी- सत्तास्थापनेसाठी भाजपाची असमर्थता

0

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडेसह भाजप नेते राजभवनात राज्यपालांच्या भेटीनंतर भाजप नेत्यांची पत्रकार परिषद घेतली. शिवसेनासोबत नसल्याने भाजप सत्ता स्थापन करु शकत नाही, शिवसेनेकडून जनादेशाचा अपमान केला गेला आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना शुभेच्छा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Loading...

सत्तास्थापनेसाठी भाजपाची असमर्थता दिसल्याने राज्यपाल आता दुसऱ्या मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देऊ शकतात.

राज्यपालांनी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होते. महाराष्ट्रातील 105 आमदार असलेला पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला निमंत्रण दिलं होते. निमंत्रणाच्या संदर्भात भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली होती. बैठकीनंतर राज्यपालांना त्यांनी निर्णय कळवला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मालाडमधील हॉटेल द रिट्रीटमध्ये जाऊन शिवसेना आमदारांची भेट घेतली. राज्यात आपलच सरकार बनणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच आतापर्यंत पालखीचे भोई होतो, आता भोई होणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आपण अजूनही युती तोडली नसल्याचं म्हणत, युतीची दारं उघडे असल्याचंही त्यांनी सूचवल्याची माहिती समोर येत आहे.

Loading...

भाजपची झोप उडविणाऱ्या संजय राऊतांनी केले कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे तोंडभरून कौतुक

Previous article

ठरलं ! शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत अखेर घेणार हा निर्णय !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.