Royal politicsटॉप पोस्ट

जम्मू-काश्मिर नंतर या राज्यातील सरकार सुध्दा लवकरच पडू शकते ?

0

जम्मू काश्मिर मधील पीडीपी आणि भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतर आता बिहारमधील जेडीयू आणि भाजपमधील युती तुटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि जेडीयू यांच्या संबधामध्ये तणावचे वातावरण निर्माण झाले आहे.

8 जुलैला जेडीयूची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वांचे लक्ष  पार्टीचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भाषणाकडे असणार आहे. या भाषणात नितीश कुमार येणाऱ्या लोकसभा निवडणूकीविषयी काय भूमिका घेणार हे स्पष्ट करतील. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना देखील ते निवडणूकीविषयी संदेश देतील.

Loading...

5 वर्षापुर्वी 2013 मध्ये देखील दिल्लीमध्ये झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात नितीश कुमार यांनी भाजपवर टिका केली होती. आणि त्यानंतर काही दिवसातच नितीश कुमार यांनी भाजपबरोबरची युती तोडली होती. त्यामुळे आता होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत ते काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बिहारला विशेष राज्याचा दर्जा – 

बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी नितीश कुमार गेले अनेक वर्षापासुन करत आहे.  आता पुन्हा तोच मुद्दा घेऊन नितीश कुमार पुन्हा मैदानात उतरले आहेत. मागील काही दिवसापासून विशेष राज्याची मागणी मागे पडली होती ; पण आता पुन्हा एकदा जेडीयू हा मुद्दा उचलून धरण्याच्या तयारीत आहे.

येत्या बैठकीत यावर चर्चा केली जाऊ शकते. धरणे – प्रदर्शन करण्याची तयारी देखील सुरू आहे.

नितीश कुमार नाराज – 

नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी बरोबर युती तोडत भाजप बरोबर हात मिळवनी करत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली होती. असे असले तरी एनडीए मध्ये नितीश कुमार हे सध्या कोणत्याही निर्णायक भुमिकेत नाही.

जागा वाटपा वरून वाद –

भाजपला गेल्या लोकसभेत जिंकलेल्या 22 जागा हव्या आहेत. तर जेडीयूला 2009 च्या निवडणूकी प्रमाणे 25 जागा हव्या आहेत. या शिवाय भाजप नितीश कुमार यांना बरोबर ठेवण्यासाठी नविन फाॅर्म्युला मांडू शकते.

अमित शाहंचा बिहार दौरा – 

येत्या 12 तारखेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे बिहारच्या दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्यात नितिश कुमार यांची देखील भेट घेणार आहेत. तेव्हाच सर्व स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणूका एकत्र लढवतील ?

चंद्राबाबू नायडू यांनी आधीच भाजपचा हात सोडून दिला आहे. या शिवाय शिवसेनेने देखील स्पष्ट केले आहे की, ते लोकसभा निवडणूका वेगळ्या लढवणार आहेत. याशिवाय अनेक प्रादेशिक पक्ष भाजपवर नाराज आहेत. अशा वेळेस नितीश कुमार यांना नाराज करणे भाजपला महाग ठरू शकते.

Loading...

पंतप्रधानांच्या जनसंवाद सभेत शेतकर्‍यांच्या येण्यावर बंदी, राजस्थान सरकारला वाटते शेतकर्‍यांची भीती

Previous article

पुण्यात तुरुंगाच्या जेलरवरच तुरुंगाबाहेर गोळीबार

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *