मुख्य बातम्या

मोठी बातमी – शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या , पत्नी आणि मुलगी जखमी

0

मध्यप्रदेशचे शिवसेना नेते रमेश साहू यांची मंगळवारी रात्री गोळा घालून हत्या करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदौरमधील तेजाजी शहर पोलीस ठाणे हद्दीत उमरीखेडा येथे शिवसेनेचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष असलेल्या रमेश साहू यांचा ढाबा आहे. याच ठिकाणी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
रमेश साहू आपल्या ढाब्यावर असताना अज्ञात व्यक्तीने गोळी घालून त्यांची हत्या केली. हत्या कुणी आणि का केली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. रमेश साहू यांच्या विरोधात हत्येचे आरोप आणि जमिनीवरील वादासंदर्भात गुन्हे दाखल आहेत.
अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जागीच मरण पावले. तर त्यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. सकाळी ढाब्यावरील कर्मचारी आत गेल्यानंतर ही घटना समोर आली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास घडली. साहू हे १० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेचे मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष होते.

महत्वाच्या बातम्या :-
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
राज्यात तब्बल १४,८८८ रुग्णांची वाढ , एकूण बाधितांचा आकडा ७,१८,७११वर
अनलॉक-4मध्ये राज्यात ‘हे’ सुरू आणि ‘हे’ बंद राहणार , वाचा सविस्तर
कोरोनाचा कहर सुरूच ! पुणे, मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढू लागले रुग्ण !!
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोठी बातमी – शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या , पत्नी आणि मुलगी जखमी InShorts Marathi.

तिच्या जाण्यानं उदयनराजे झाले हळवे , शेअर केली भावनिक पोस्ट

Previous article

बच्चन कुटुंबीयांमध्ये झाली नव्या पाहुणीची एंट्री

Next article

You may also like

Comments

Comments are closed.