टॉप पोस्टराजकारण

भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी ५ जणांना अटक

0

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसक प्रकारानंतर पुणे पोलिसांकडून माओवादी कार्यकर्ता रोना विल्सन आणि वकील सुरेंद्र गडलींग यांच्यासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.या सोबतच महेश राऊत, सुधीर ढवळे , शोमा सेन यांना देखील अटक करण्यात आली.

३१ डिसेंबर २०१७ रोजी  झालेल्या पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेचे आयोजन केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आहे. काही महिने आधी सुधीर ढवळे  यांच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली होती.  तसेच विविध शहरातील कबीर कला मंचची कार्यालये आणि रिपब्लिकन पॅन्थर ची कार्यालयांवर पोलिसांकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या. आज सकाळी त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Loading...

माओवादी कार्यकर्ता रोना विल्सन याला दिल्लीतून तर वकील सुरेंद्र गडलींग याला नागपूरतून पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण ?

३१ डिसेंबर २०१७ ला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंबाला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालिद, प्रकाश आंबेडकर आणि कबीर कला मंचचे इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. या परिषदेत कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांकडून गीत सादर करून लोकांना चेतवल्याचा आरोप करण्यात आला होता. या  एल्गार परिषदेनंतर १ जानेवारी २०१८ ला भीमा कोरेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला. यावेळी वडू येथे संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन तरुणांनी रॅली काढली होती. त्याच वेळी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंबाचे दर्शन घेण्यासाठी जाणार्‍या आंबेडकरी अनुयायांचे रस्त्यावर झालेल्या गर्दीच्या कारणाने वाद झाला आणि त्याचे रूपांतर जाळपोळ आणि दंगलीत झाले. या मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू आणि काही लोक जखमी          झाल्याने हा वाद आणखी चिघळला.

“हिंसाचाराच्या वास्तविक गुन्हेगारांचे रक्षण करून खोट्या कथा निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करीत आहे” असा आरोप लोकशाही हक्क संरक्षण समितीकडून महाराष्ट्र सरकारवर करण्यात आला आहे.

संभाजी  भिडें यांना अटक न करण्यात आल्याने शौर्य प्रेरणा अभियानाच्या आयोजकांकडून निषेध नोंदवण्यात आला आहे.

Loading...

या देशाने दिले महिलांना पहिल्यांदाच ड्रायव्हिंग लायसन्स

Previous article

व्हिडिओ | या पंतप्रधानाने केली चक्क वायपर घेऊन सफाई

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *