” लोक म्हणतात तुमचेच सरकार आहे तर मंदिर का बनत नाही. पण सरकार बदलल्याने मागण्या पूर्ण होतात हा भ्रम आहे आणि तो आजही कायम आहे. राजकारण आडवे आले नसते तर राममंदिर कधीचेच झाले असते. आता सरकारने लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करावा. यासंदर्भात देशात संत महात्मा जे पाऊल उचलतील, आम्ही त्यांच्यासोबत आहोत”, असे स्पष्ट मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार) येथे केले.

येथील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. यावेळी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Loading...

डॉ. भागवत म्हणाले, “सोशल मीडियावर येणारा चिथावणीखोर मजकूर पाकिस्तान, इटली, अमेरिका येथून येतो की काय अशी शंका येते. “भारत तेरे टुकडे होंगे” असे नारे देणाऱ्या आंदोलकांमागे काही प्रमुख चेहरे आहेत. चिथावणीखोर भाषणांमुळे तेही लोकांना माहित झालेले आहेत. दहशतवादाशी संबंध ठेवणाऱ्या या लोकांच्या मनात अचानक पीडितांबद्दल संवेदना कशा निर्माण झाल्या, याचाही विचार व्हायला हवा.”

“दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,” असेही श्री. भागवत म्हणाले .

येत्या निवडणुकांमध्ये पुढील पाच किंवा अनेक वर्षे पश्चाताप होणार नाही, याचा विचार करून मतदान करा, असे आवाहन सरसंघचालकांनी केले. उपलब्ध उमेदवारांपैकी सर्वोत्तम निवडा अन्यथा नोटाचा पर्याय आहे. पण नोटा वापरताना तो आत्मघाती ठरणार नाही, याचीही काळजी घ्या, असेही सरसंघचालक म्हणाले.

Loading...

चीनचा भन्नाट शोध…..तीन कृत्रिम चंद्रांची निर्मिती

Previous article

मोदी ट्रेनिंग देऊन खोटं बोलवून घेतात – उद्धव ठाकरे

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *