Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

पक्ष बदलण्यासंदर्भात आ.भारत भालके यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

0

टीम महाराष्ट्र देशा- गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले आमदार भारत भालके यांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व सुशिलकुमार शिंदे हे पोटच्या मुलासारखे संभाळतात तर अशा लोकांपासून मी कुठे जाणार म्हणत, पक्ष बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसून काही जणांकडून माझ्या बोलण्याचा विपर्यास करत ‘ध चा मा’ करण्यात आला आहे. पक्ष बदलणार असल्याच्या नुसत्या वावड्या असल्याचे सांगत भालके यांनी पक्ष बदलाच्या चर्चेला पुर्णविराम दिला. श्रीराम मंगल कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भालके म्हणाले, माझ्या घरातील कोणी आमदार खासदार नाहीत जनता हिच माझी सार्वभौम आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांनी मंगळवेढा सोडून अन्य तालुक्याला निधी दिला मग मंगळवेढ्यावरच अन्याय का? पुढील महिन्यातही मला दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करावा लागेल याचाही अर्थ ‘लैला मजनू’ सारखा कुणी काढू नये असं देखील ते म्हणाले .

Loading...

‘या’ मुद्द्यावरून सुरु आहे पुणे कॉंग्रेसमध्ये यादवी

Previous article

दोन झुंजार नेत्यांची भेट …चर्चा तर होणारचं

Next article

You may also like

Comments

Comments are closed.