Royal Entertainmentमुख्य बातम्या

यूपीआय व्यवहारावरील शुल्क बॅंकांकडून रद्द

0

मुंबई – यूपीआय, रूपे, क्‍यू आर कोड आधारित व्यवहारावर बॅंकांनी शुल्क आकारू नये, जर आकारले असेल तर हे शुल्क परत करावे, अशी सूचना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने गेल्या रविवारी केली होती. त्यानंतर ज्या बॅंका असे शुल्क आकारीत होत्या त्या बॅंकांनी हे शुल्क आकारणे थांबविले आहे. 
विनाशुल्क व्यवहाराचा गैरफायदा काहीजण घेतील यासाठी काही बॅंकांनी 20 पेक्षा जास्त व्यवहारावरील व्यवहारास शुल्क आकारण्यात चालू केले होते. मात्र, कर मंडळाने स्पष्ट सूचना केल्यानंतर या बॅंकांनी असे शुल्क घेणे थांबले असल्याचे दिसून येते स्टेट बॅंकेसह सरकारी बॅंका असे शुल्क आकारत नव्हत्या.
काही खासगी बॅंका शुल्क आकारत होत्या. आता सर्वच बॅंकांनी असे शुल्क घेणे थांबविले आहे.
केंद्र सरकारने नागरिकांनी जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल करावे, त्याकरिता गेल्यात तीन वर्षांपासून व्यापक मोहीम राबविली आहे. मात्र, या काळामध्ये डिजिटल व्यवहार करण्याची आवश्‍यकता असतानाच बॅंकांनी असे शुल्क लावल्यामुळे कर विभागाने खेद व्यक्त केला होता.
या शुल्क आकारणीच्या विरोधात बऱ्याच तक्रारी आल्यानंतर गेल्या रविवारी प्रत्यक्ष कर मंडळाने असे शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे, यापुढे शुल्क आकारू नये आणि आकारले असल्यास ते ग्राहकांना परत करण्यास सांगितले होते.
The post यूपीआय व्यवहारावरील शुल्क बॅंकांकडून रद्द appeared first on Dainik Prabhat.

यूपीआय व्यवहारावरील शुल्क बॅंकांकडून रद्द

Previous article

असे सोडवा झोपेचे गणित…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.