Royal politicsटॉप पोस्ट

अमित शाह संचालक पदी असलेल्या बँकेत बंद झालेल्या नोटांचा सर्वात जास्त भरणा- RTI

0

2016 मध्ये झालेल्या नोटाबंदी नंतर जिल्हा सहकारी बँकांवर केंद्राकडून आणि आरबीआयकडून अनेक निर्बंध लादण्यात आल्यानंतर आता एक मोठ्या घटनेचा खुलासा झाला आहे.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे ज्या सहकारी बँकेच्या संचालक पदावर होते त्या बँकेत नोटबंदीच्या दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या  500 आणि 1000 च्या  सर्वात जास्त नोटा जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे.  ही घटना माहिती अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेल्या उत्तरावरून उघड झाली आहे.

Loading...

8 नोव्हेंबर 2016 ला संपूर्ण देशात नोटाबंदी लागू करण्यात आली होती.  यावेळी 500 आणि 1000 च्या नोटा चलंनातून हद्द पार झाल्या होत्या. लोकांनी नोटा बदलून घेण्यासाठी बँकांच्या बाहेर दिवस रात्र रांगा लावून नोटा बदलून घेतल्या.

नोटबंदीच्या 5 दिवसा नंतर 14 नोव्हेंबर 2016 पासून देशातील सहकारी बँकांवर नोटा जमा आणि बदलून देण्यासाठी बंधने आणली होती. कारण देशातील अनेक सहकारी बँका या राजकीय नेत्यांच्या अथवा राजकीय नेत्यांच्या संलग्न आहेत.  यामुळे सहकारी बंकांच्या माध्यमातून अवैध पैसे (काळे धन ) वैध केले जातील अशी शंका होती.

अमित शाह यांच्या बँकेत बाद झालेल्या नोटांचा सर्वात जास्त भरणा-

परंतू आता माहिती अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाला मिळालेल्या उत्तरानुसार अहमदाबाद  जिल्हा सहकारी बँकेने (एडीएसबी) पंतप्रधानांनी केलेल्या नोटाबंदीनंतर फक्त 5 दिवसात 745.59 कोटी रुपये येवढे बंदी घालण्यात आलेल्या नोटांचे (500,1000) मूल्य जमा केले होते.

बँकेच्या वेबसाइट वर उपलब्ध असलेल्या माहिती नुसार अमित शाह त्या वेळी या बँकेचे संचालक होते, ते अनेक वर्ष त्या पदावर स्थित होते. 2000 साली ते या बँकेचे अध्यक्ष देखील होते.

एडीएसबी कडे 31 मार्च 2017 मध्ये एकूण 5,050 कोटी रुपये जमा होते, आणि 2017-18 या वित्त वर्षात या बँकेला 14.31 कोटीचा फायदा (प्रॉफिट) देखील झाला.

अहमदाबाद आणि राजकोट मधील सहकारी बँकेत सर्वात जास्त बाद नोटा जमा- 

एडीएसबी या बँकेनंतर सगळ्यात जास्त बंदी घालण्यात आलेल्या नोटा जर कोणत्या सहकारी बँकमध्ये जमा झाल्या असतील तर ती राजकोट सहकारी बँक होती, जिचे अध्यक्ष जयेशभाई विठ्ठलभाई रडाडिया हे होते, जे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री आहेत. या सहकारी बँकेमध्ये 693.19 एवढ्या मूल्याचे बंदी असलेल्या नोटा जमा झाल्या होत्या.

गुजरात राज्य सहकारी मर्यादित बँक मध्ये जमा करण्यात आलेल्या 1.11 कोटी या रक्कमेपेक्षा अहमदाबाद आणि राजकोट मधील सहकारी बँकेत जमा झालेल्या रक्कमा खूप अधिक आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता मनोरंजन एस. रॉय यांनी आयएएनएस शी बोलताना संगितले की, “नोटाबंदी नंतर पहिल्यांदाच माहिती अधिकारातून राज्य सहकारी बँका (एससीबी) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये (डीसीसीसी) जमा रक्कमेचा खुलासा झाला आहे.”

देशभरातील 7 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, 32 राज्य सहकारी बँका, 370 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाममधून आणि देशभरातील लहान 36 पोस्ट ऑफिसमधून ‘आरबीआय’मध्ये जमा झालेले 7.91 लाख कोटी रुपये हे बाद झालेल्या चलनातील एकूण 15.28 लाख कोटी या रक्कमे इतपत होते. म्हणजे बाद झालेल्या चलनाच्या रक्कमेपेक्षा निम्मे आहे.

आश्चर्य-

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही सर्वात पहिल्या अंकावर असलेली बँक आहे ज्यामध्ये 55 बँकेच्या शाखांमध्ये  1,128 कोटी रुपये जमा करण्यात आले. तर  झारखंड राज्य सहकारी बँकेच्या 5  शाखांमध्ये 5.94 कोटी रक्कम जमा करण्यात आली.

आश्चर्याची बाब म्हणजे फक्त 4 लाख लोकसंख्या असलेल्या अंदमान निकोबार मधील अंदमान निकोबार राज्य सहकारी बँकेच्या 29 शाखांमध्ये 85.76 कोटी रुपये जमा झाले.  महाराष्ट्र (12 कोटी ) झारखंड(3.6 कोटी )च्या लोकसंख्येचा आणि तेथे सहकारी बँकेमध्ये जमा झालेल्या रक्कमेचा विचार करता हे धक्कादायक आहे.

तर ओडिसातील बंकी मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोटबंदीच्या काळात बाद झालेल्या चलनातील नोटांची शून्य रक्कम जमा झाली.

सार्वजनिक क्षेत्रातील बँका असलेल्या  भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, देना बँक, विजया बँक, आंध्रा बँक, सिंडिकेट बँक, यूको बँक, युनायटेड बँक ,ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि आयडीबीआय बँक या 14 बँकांच्या  63,500 पेक्षा अधिक शाखांमधील  ठेवींबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

माहिती अधिकरातून मिळेलेले  ही माहिती मुख्य महाप्रबंधक आणि नाबार्डचे के.एस. सर्वानवल  यांनी दिली.

Loading...

Human Interest:- तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या प्रेमापोटी कधी आंदोलन केले आहे का? या विद्यार्थ्यांनी केले आहे जाणून घ्या का ?

Previous article

भारतातील 70 % वापरण्यायोग्य पाणी प्रदुषित, दर वर्षी 2 लाख लोकांचा मृत्यू

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *