टॉप पोस्ट

डीएसके घोटाळ्यात वाढ, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांना अटक

0

पुणे:-

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या प्रकारात पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी केल्यानंतर आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. आता डीएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारांना अटक करण्यात आली आहे.

Loading...

बँक अधिकार्‍यांनीच दिले नियमबाह्य कर्ज-

या प्रकरणात बँकेच्या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून डी एस के यांचे कर्ज मंजूर करून दिले असल्याने आता बँक ऑफ महाराष्ट्र देखील चर्चेत आली आहे.
बँकेचे अधिकारी मराठे, देशपांडे, गुप्ता यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून डी एस के यांना ड्रीम सिटी या फुरसुंगीतील गृहप्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून दिले, तर याशिवाय बँकेची सहमती नसताना आणखी 50 कोटी रुपये कर्जाच्या नावाखाली मंजूर केले.

या गैरव्यवहाराप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, विभागीय व्यवस्थापक देशपांडे, बँकेचे माजी अध्यक्ष मुहनोत यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

डीएसके यांच्या अदृश्य कंपन्या-

या प्रकरणाची पोलिसांकडून पडताळणी करण्यासाठी अर्थतज्ज्ञ, फॉरेन्सिक तज्ज्ञांची देखील मदत घेण्यात आली, यावरून हे प्रकरण उघड झाले.

डी एस के यांच्या 8-9 कंपन्यांपैकी एकाच कंपनी नोंदणीकृत असल्याचे समोर आले आहे, आणि याच अस्थितत्वात नसलेल्या कंपन्यांना बँकेच्या अधिकाऱ्यांनी गैरप्रकार करून नियमबाह्य कर्ज मिळवून दिले.

ठेवीदारांनी ठेवलेले पैसे याच अदृश्य कंपन्यांमध्ये वळवण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी मागील महिन्यांमध्ये त्यांच्या पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

डीएसके घोटाळ्यात आणखी वाढ-

कुलकर्णी यांनी जवळपास 36 हजार ठेवीदारांची 2 हजार 43 कोटींची फसवणूक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आल्या दोषारोप पत्रात उघड झाले आहे.

असे असताना आता बँक ऑफ महाराष्ट्रचा आणखी जवळपास 150 कोटींचा घोटाळा समोर येत आहे. कुलकर्णी यांना दिलेल्या कर्जाचा वापर त्यांनी ड्रीम सिटी या गृहप्रकल्पासाठी केला की नाही याची बँकेकडून पाहणी सुद्धा करण्यात आली नाही. यातील 50 ते 60 कोटीचा वापर कुलकर्णी यांनी आपल्याच घराच्या नूतनीकरणासाठी केल्याचे समोर आले आहे.

शिवाय यातील पैशांचा वापर थकीत ठेवीदारांचे व्याज देण्यासाठी तर तब्बल 13 लाख रुपये ‘स्पा’ साठी खर्च केल्याचे स्पष्ट होत आहे.

Loading...

सुब्रमणियन लवकरच सोडणार आर्थिक सल्लागार पद

Previous article

वेगवेगळ्या धर्माचे कारण सांगत पासपोर्ट देण्यास नकार, सुषमा स्वराज यांच्याकडून कारवाई

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *