टॉप पोस्ट

‘बँक ऑफ महाराष्ट्र’ प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले

0

पुणे:-

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी प्रकरणात बँकेच्या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून डीएसके यांचे कर्ज मंजूर करून दिल्या प्रकरणी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या अधिकार्‍यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. परंतू आता हे प्रकरण पुणे पोलिसांना चांगलेच भोवल्याचे दिसते आहे.

Loading...

या कारवाई दरम्यान पुणे पोलिसांकडून गृह विभागाला थांगपत्ता लागू न देताच कारवाई केली. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणतीही कल्पना देण्यात न आल्याचे आता समोर आले आहे. हे राज्याचे गृह विभागासाठी धक्कादायकच आहे. प्रश्न जिकरीचा झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित तपास यंत्रणेतील अधिकार्‍यांना चांगलेच खडसावल्याचे कळते आहे.

काय आहे नक्की की पुणे पोलिसांना ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ प्रकरण महागात पडले-

बँकांची पालक बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेला कोणतीही पूर्व कल्पना न देताच राज्य सरकारच्या कायद्यातील तरतुदीच्या आधारे पुणे पोलिसांकडून ‘एमपीआयडी’ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे स्पष्ट होत आहे. बँके विरोधात पोलिसांकडे काही तक्रार करण्यात आली आहे का किंवा नाही या बाबत अजून तरी काही स्पष्ट झाले नाही.

बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयीकृत बँक असून त्या बँके संबंधित किंवा त्या बँकेच्या अधिकार्‍यांना संबंधित कोणतीही कारवाई करायची असेल तर त्याची पूर्व कल्पना पोलिसांकडून रिझर्व्ह बँकेला देणे अत्यंत आवश्यक असते.

 आरबीआय कलम 58 ई अन्वये अशा प्रकरणात परवानगी घेणे आवश्यक असते. ती परवानगी मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करता येते. परंतू अशी परवानगी पुणे पोलिसांकडून घेण्यात आली नाही.

काय आहे एमपीआयडी कायदा – 

The Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act 1999 ,  महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९.

यात ‘ठेव’ या शब्दाचा अर्थ कोणत्याही वित्तीय संस्थेने, व्याज, लाभांश, फायदा यांच्या स्वरूपातील किंवा कोणत्याही अन्य स्वरूपातील कोणत्याही लाभ किंवा एका विशिष्ट मुदतीनंतर अन्यथा, रोख रक्कमेच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात किंवा एखाद्या विनिर्दिष्ट सेवेच्या स्वरूपात परत करण्यात येणारा, घेतलेला कोणताही पैसा किंवा स्वीकारलेली कोणतीही मौल्यवान वस्तू यांचा समोवश होतो.

या कायद्या अंतर्गत पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Loading...

Hockey Champions Trophy 2018: भारत आज भिडणार पाकिस्तानशी

Previous article

Hockey Champions Trophy 2018: भारताने पाकिस्तानला 4-0 ने दिली मात

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *