खेळटॉप पोस्ट

Women’s Asia Cup: भारताचा पराभव करत बांगलादेशने जिंकला पहिल्यांदाच आशिया कप

0

कुआलालुंपूर(मलेशिया):- 

शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या आशिया कपच्या फायनल मॅचमध्ये बांगलादेश संघाने भारताचा 3 विकेट्सने पराभव करत पहिल्यांदाच आशिया कपवर नाव कोरले. आशिया कपच्या फायनलमध्ये पराभव होण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे.

Loading...

भारताच्या 112 रन्सचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघाच्या सलामी जोडीने सावकाश खेळ करत पाॅवर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 33 रन केले.  पुनम यादवने सातव्या ओव्हरला अयशा रहमानच्या(16)  रूपात भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्याच ओव्हरमध्ये पुनम यादवने शमीना सुलतानाला(17) बाद करत बांगलादेशला आणखी एक झटका दिला.

बांगलादेशतर्फे निगर सुलतानाने 24 बाॅलमध्ये 27 रन केले. तर रूमाना अहमदने 23 रन केले. भारतातर्फे पुनम यादवने 4 विकेट तर हरमनप्रीत कौरने 2 विकेट घेतल्या पण ते भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहित.

त्याआधी बांगलादेश संघाने टाॅस जिकूंन फिल्डिंगचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंगसाठी मैदानात आलेल्या भारतीय महिला संघाची सलामीची जोडी मिताली राज व स्रिती मंधना यांनी सावकाश सुरूवात केली. तिसऱ्या ओव्हरला भारताचा स्कोर 12 रन असताना स्म्रिती मंधना रन आउट झाली. तिला नाहिदा अख्तरने रन आउट केले.

त्यानंतर आलेली दिप्ती शर्मा देखील मोठा स्कोर करण्यात अपयशी ठरली. तिने केवळ 4 रन केले. दिप्ती शर्मा आउट झाल्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या कॅप्टन हरमनप्रीत कौरने एका बाजूने डाव सांभाळत 42 बाॅलमध्ये 7 फोरच्या साह्याने 56 रन्स केले.  एका बाजूने विकेट पडत असताना कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत 112 रन्सपर्यंंत मजल मारली.

संपुर्ण डावात भारताचे तीन खेळाडू रन आउट झाले. बांगलादेशतर्फे रूमाना अहमद व खादिजा तुल कुब्रा यांनी प्रत्येकी 2 तर सलमा खातून आणि जहानरा आलम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

स्कोरबोर्ड :-

भारतीय महिला संघ :- (हरमनप्रीत कौर 56, वेदा क्रिशनमुर्ती 11,  रूमाना अहमद 22/2 विकेट,   खादिजा तुल कुब्रा 23/2 विकेट )

बांगलादेश महिला संघ :- (निगर सुलताना 27, रूमाना अहमद 23, शमीना सुलताना 17,   पुनम यादव 9/4 विकेट, हरमनप्रीत कौर 19/2)

(PHOTO INPUT:- TWITTER/ICC)

Loading...

भारत बनलाय या आंतरराष्ट्रीय संघटनेचा संपूर्ण सदस्य; पहिल्यांदाच सहभागी होणार या संघटनेच्या परिषदेत

Previous article

FOOTBALL: इंटरकॉन्टीनेंटल चषकावर भारताची मोहोर; चाहत्यांमध्ये उत्साह

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ