मुख्य बातम्या

अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही ; विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये

0

अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणावरुन आक्रमक झालेल्या विश्व हिंदू परिषदेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ नका असं बजावलं. यावरुन आता काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये असा इशाराच दिला आहे.
याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, विश्व हिंदू परिषद धर्माचे मालक नाहीत, त्यांनी जास्त वळवळ करु नये, विश्व हिंदू परिषदेत केवळ हिंदू नाव आल्याने धर्म त्यांचा झाला का? आम्ही हिंदू नाही का? यांचे बापाचे आम्ही बांधील नाही. विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रीय भानगडीत पडू नये असं त्यांनी सांगितले.
तसेच अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही, कोणी कोणाला रोखू शकत नाही, हिंमत असेल तर रोखून दाखवावं. ज्या दिवशी वाटेल तेव्हा उद्धव ठाकरे जातील. हा प्रश्न धार्मिक भावनेचा आहे. अयोध्या आंदोलन विश्व हिंदू परिषद कुठे होती असा सवालही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-

चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर !
“उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर…” अयोध्येतील संतांकडून मुख्यमंत्र्यांना धमकी
संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप
सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?
धनंजय मुंडेंनी घेतला कंगनाच्या वक्तव्याचा समाचार , म्हणतात..

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही ; विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये InShorts Marathi.

कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका ; मुश्रीफांचा खासगी डॉक्टरांना सल्ला

Previous article

.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.