मुख्य बातम्या

दिल्लीत एका तरुणाने पवारांना हाणले होतं हे आव्हाड विसरलेले दिसतायत ; भाजपचा आव्हाडांवर घणाघाती हल्ला

0

मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कार्टून फॉरवर्ड केल्याने एका निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली. या मारहाणीत ६५ वर्षीय मदन शर्मा यांना गंभीर दुखापतही झाली. या घटनेवरुन विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं. यानंतर संजय राऊत यांनी या प्रकारावर भाष्य केले.
या संपूर्ण घडामोडीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला काळाची गरज असं कॅप्शन दिल्याने नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसने केलंय का? असा प्रश्न निर्माण झाला. यावरुन आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, मंत्रीपदावर असताना लोकांचे अपहरण करून मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड भुरट्या गुंडगिरीचे समर्थन करणारच. मागे दिल्लीत एका तरुणाने पवारांना हाणले होते ते आव्हाड विसरलेले दिसतायत. त्याचेही समर्थन करा आता अशा शब्दात त्यांनी आव्हाडांना टोला लगावला आहे.

माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांकडून समर्थन…
मंत्रीपदावर असताना लोकांचे अपहरण करून मारहाण करणारे @Awhadspeaksभुरट्या गुंडगिरीचे समर्थन करणारच. मागे दिल्लीत एका तरुणाने पवारांना हाणले होते ते आव्हाड विसरलेले दिसतायत. त्याचेही समर्थन करा आता. pic.twitter.com/NPH5OmYw1T
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 13, 2020

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिल्लीत एका तरुणाने पवारांना हाणले होतं हे आव्हाड विसरलेले दिसतायत ; भाजपचा आव्हाडांवर घणाघाती हल्ला InShorts Marathi.

मारहाणीचे राऊतांनी केलेलं समर्थन म्हणजे बेशरमपणाचा कळस ; भातखळकरांची सडेतोड टीका

Previous article

लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची लागण ; भाजपाचे डझनभर तर एक शिवसेनेचा नेता बाधित

Next article

You may also like

Comments

Comments are closed.