खेळटॉप पोस्ट

34 वर्षांनी आॅस्ट्रोलियाच्या संघाबरोबर घडली ही गोष्ट

0

2019 च्या वर्ल्ड कपला फक्त एक वर्ष बाकी असताना मागील वर्ल्ड कप विजेत्या आस्ट्रोलिया संघाची वनडे मधील आयसीसी रॅंकिग ही सहाव्या स्थानावर घसरली असून, 34 वर्षांनंतर आॅस्ट्रोलियन संघाची रॅंकिग येवढी खाली घसरली आहे. या आधी 1984 साली आॅस्ट्रोलियाची टीम सहाव्या स्थानावर घसरली होती. आस्ट्रोलियन संघ हा पाच वेळेचा वर्ल्ड कप विजेता संघ आहे.

पाकिस्तान संघाने आॅस्ट्रोलियन संघाला मागे टाकत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. पाकिस्तानच्या आधी प्रथम चार क्रमांकावर अनुक्रमे इंग्लंड, भारत, साउथ अफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ आहेत.

Loading...

टेस्टमध्ये आॅस्ट्रोलियाचा संघ तिसऱ्या तर टी-20 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

सध्या आॅस्ट्रोलियाचा संघ इंग्लंडबरोबर 5 वनडे मॅचची सिरीज खेळत असून , पहिल्या दोन मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आॅस्ट्रोलियाचे रेटिंग पाॅईंन्टस 102 झाले आहेत. 2016 ते 17 पासून  आॅस्ट्रोलियन संघाने 15 वनडे मध्ये 13 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच शेवटच्या 10 मॅचमध्ये फक्त 2 वेळा त्यांचा विजय झाला आहे.

सध्या हा संघ टिम पेनच्या नेतृत्वाखाली खेळत अाहे. वाॅर्नर व स्मिथ हे आॅस्ट्रोलियाचे मुख्य खेळाडू बाॅल टेम्परिंगमुळे बाहेर असून अन्य खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत.

आयसीसी वनडे रॅंकिग –

 

(PHOTO INPUT :- FACEBOOK/Australian Men’s Cricket Team)

 

Loading...

अरविंद केजरीवाल यांना नायब राज्यपालांच्या कार्यालयात आंदोलन करण्याची परवानगी कोणी दिली – दिल्ली हायकोर्ट

Previous article

या केंद्रशासित प्रदेशाने देखील केली स्वतंत्र राज्याच्या दर्जाची मागणी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ