मुख्य बातम्या

‘अति तिथे माती’ शिवसेनेचा अंत जवळ आलाय ; निलेश राणेंचा सेनेवर हल्लाबोल

0

शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणेंचे पुत्र आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. काल नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केल्यानंतर निलेश राणेंनी आज ड्र्ग्स प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले आहे. काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. मराठीमध्ये म्हण आहे ‘अति तिथे माती’… शिवसेनेचा अंत जवळ आलाय, अशा शब्दात निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचले आहे.
सध्या गाजत असलेल्या ड्रग्स प्रकरणात शिवसेनेच्या एका उपनेत्याचा मुलाची पोलिसांनी चौकशी केल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे. त्या वृत्ताचा आधार घेत निलेश राणेंनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले.
आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. ड्र्ग्स व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस अशी आजच्या शिवसेनेची ओळख बनली आहे. मराठीमध्ये म्हण आहे ‘अति तिथे माती’… शिवसेनेचा अंत जवळ आलाय, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. बलात्कारी, ड्रग्स व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, चमडी केस ही ओळख आजच्या शिवसेनेची. मराठीमध्ये म्हण आहे ‘अति तिथे माती‘… शिवसेनेचा अंत जवळ आलाय. pic.twitter.com/iJ9GfTAJM0
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 24, 2020

महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी : NCBकडून समन्स स्वीकारण्यास रकुल प्रीतची टाळाटाळ
मुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला ; केली ‘ही’ मागणी
NCBच्या कामात ठाकरे सरकार हस्तक्षेप करतंय ; नवनीत राणांचा गंभीर आरोप
#बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन – ‘दारू मी निवडलेलं ड्रग होतं’ , पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा
धक्कादायक : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन !
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘अति तिथे माती’ शिवसेनेचा अंत जवळ आलाय ; निलेश राणेंचा सेनेवर हल्लाबोल InShorts Marathi.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का? काँग्रेसचा थेट सवाल

Previous article

सरकारच्या चिंतेत वाढ ; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची बाधा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.