Royal politicsटॉप पोस्ट

Atal Bihari Vajpeyee : राज्यशास्त्राचा विद्यार्थी जेव्हा भारताचा पंतप्रधान होतो

0

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. यांची तब्येत मागील काही महिन्यापासून अत्यंत नाजुक होती. अटल बिहारी वाजपेयी याचे शालेय जीवन नक्की होते तरी कसे असा प्रश्न पडणे साहजिक आहे, कारण आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती काहीतरी कष्ट घेऊनच पुढे आलेली असते.  अटल बिहारी वाजपेयींचे जीवन देखील असेच होते. त्यांनी मोठ्या कष्टाने आपले शिक्षण पूर्ण केले.

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये 25 डिसेंबर 1924 साली झाला. वाजपेयी यांचे प्राथमिक शिक्षण तिच्या जन्माच्या ठिकाणीच म्हणजे ग्वालियर येथे पूर्ण झाले. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांना राज्यशास्त्र विषयात पदवी घेण्यासाठी कानपुरला जायचे होते. परंतू कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी त्यांना कानपुरला पाठवू शकले नाहीत.

एकाच वर्गात शिकले पिता पुत्र- 

Loading...

त्यानंतर ग्वालियरचे तेव्हाच्या राजाने त्यांना 72 रुपयाची शिशुवृत्ती देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी कानपुरला पाठवले. अटल बिहारी वाजपेयी यांनी कानपुरमध्ये डीएव्ही ( दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय ) या कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विषयात मास्टर डिग्री पूर्ण केली. यानंतर त्यांनी याच कॉलेजमधून वकिलीच शिक्षण घेतले. विशेष म्हणजे मुलाला वकिलीचे शिक्षण घेताना पाहून त्यांच्या वडिलांनी देखील त्याच वर्षी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी अॅडमिशन घेतले. मुलगा आणि वडील दोघेही एकाच वर्गात शिकत होते.

खरतर त्यांचे मूळ गाव उत्तरप्रदेशमधील बटेश्वर. परंतू त्यांचे वडील मध्यप्रदेशात शिक्षक असल्याने त्यांचा जन्म देखील मध्यप्रदेश मधलाच. परंतू ते उत्तरप्रदेशच्या लखनऊमधून संसदेत खासदार म्हणून निवडून गेले.

‘हर न मानूंगा,रार नही ठांनुंगा…’ 

त्यांना कविता बनवण्याची अत्यंत आवड होती. त्या कविता कायम त्यांनी वेळोवेळी ऐकवल्या आणि त्या सगळ्यांसाठीच प्रेरणादाई ठरल्या. त्यांचा कविता संग्रह ‘मेरी इक्यावण कविताए’ खूप प्रसिद्ध झाला. त्यातली  ‘हर न मानूंगा,रार नही ठांनुंगा…’  ही कविता कायमच सगळ्यांच्या पसंतीला उतरली.

पत्रकारितेपासून करिअरचा प्रवास सुरू करणारा पंतप्रधान- 

कवी म्हणून समाजात ओळख निर्माण करण्याचे स्वप्न पाहणार्‍या अटल बिहारी वाजपेयी याच्या जीवनाला एक वेगळेच वळण मिळाले. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात पत्रकार म्हणून केली. पत्रकारितेतूनच त्यांच्या राजनैतिक जीवनाला कलाटणी मिळाली. ते संघाचे मुखपत्र महणून ओळखल्या जाणार्‍या ‘राष्ट्रधर्म’, ‘वीर अर्जुन’, ‘पांचजन्य’ या वृत्तपत्राचे  संपादक होते.

भारताचा एक असा नेता जो तब्बल 3 वेळा झाला भारताचा पंतप्रधान- 

बहुमताचा आकडा नसल्याने 1996 मध्ये त्यांचे सरकार फक्त एका मतांनी पडले, हे सरकार फक्त 13 दिवस सत्तेत राहिले, त्यानंतर त्यांना पंतप्रधान पदाचा त्याग करावा लागला. त्यानंतर त्यांनी विरोधकाची भूमिका निभावली. त्यानंतर ते  पुन्हा 1998 ला सत्तेत आले आणि पंतप्रधान बनले. हे सरकार 13 महीने टिकले.

त्यानंतर ते पुन्हा 1999 मध्ये भारताचे पंतप्रधान झाले. ह्या सरकारने संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केला. या सरकारला जम्बो मंत्रिमंडळ लाभले होते. या सरकारने तब्बल 24 पक्षांना मिळून एनडीएचे सरकार स्थापन केले. या मंत्रालयात 80 पेक्षा जास्त मंत्री होते.

आयुष्यभर अविवाहित राहिलेला भारताचा पंतप्रधान- 

राजकारणात अत्यंत कौशल असलेल्या वाजपेयी आयुष्यभर अविवाहित राहिले. राजकीय सेवेचे व्रत घेण्याच्या निर्णयाने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय वाजपेयी यांनी घेतला होता.

हे ही वाचा – 

कवी ते पंतप्रधान – अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन प्रवासाचा आढावा

Atal Bihari Vajpayee Death : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन

अटल बिहारी वाजपेयी यांची चर्चित भाषणे, ज्यांची आजही मिसाल दिली जाते

Loading...

कवी ते पंतप्रधान – अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन प्रवासाचा आढावा

Previous article

क्रस्ना डायग्नोस्टीक्स संस्थेतर्फे सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटमध्ये १३० झाडांचे मोफत वृक्षा रोपण

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *