Royal politicsटॉप पोस्ट

Atal Bihari Vajpayee Death : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन

0

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. यांची तब्येत मागील काही महिन्यापासून अत्यंत नाजुक होती. त्यांना दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ते बर्‍याच वर्षापासून डिमेशिया या आजाराने त्रस्त होते आणि मागील काही महिन्यांपासून त्यांना किडनीचा त्रास जाणवत होता. गेल्या 36 तासापासून त्यांची तब्येत खूपच खालावली होती. 11 जून 2018 पासून ते एम्समध्ये उपचार घेत होते.

Loading...

अटल बिहारी वाजपेयी युरियन इन्फेकशन आणि किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याचे डायलेसिस जून महिन्यात एम्स हॉस्पिटलकडून करण्यात आले. परंतू बुधवारपासून त्यांची तब्येत अत्यंत खराब झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 2009 साली त्यांना स्टोक आल्यानंतर त्यांची स्मरणशक्ती देखील कमजोर झाली होती. त्यानंतर त्यांना डिमेशिया, मधुमेह या आजाराने ग्रासले.

डिमेशिया हा आजार व्यक्तीची समरणशक्ती कमी करतो- 

या आजाराने माणसाची स्मरणशक्ती हळू हळू कमी होत जाते, यामुळे व्यक्ती स्वतहाची कामे देखील नीट करू शकत नाही. या व्यक्तीमध्ये शॉर्ट टर्म मेमरी लॉस ची लक्षणे दिसू लागतात. या आजाराने व्यक्तीच्या स्वभावात बदल होण्यास सुरुवात होते. यामुळे व्यक्ती चिडचिड करते, एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारते. डिमेशिया आजाराने व्यक्तीची तब्येत दिवसेंदिवस खलवत जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या मंत्र्यांनी घेतली वाजपेयीची भेट- 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आडवाणी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची एम्समध्ये जाऊन भेट घेतली होती.  त्यानंतर केंद्रीय मंत्री  सुरेश प्रभू, जितेंद्र सिंह, शाहनवाज हुसैन, हर्षवर्धन, स्मृती इराणी,सुमित्रा महाजन, जे पी नड्डा यांनी देखील वाजपेयीची भेट घेतली. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील एम्स मध्ये जाऊन वाजपेयी यांची भेट घेतली.

 

Loading...

अटल बिहारी वाजपेयी यांची चर्चित भाषणे, ज्यांची आजही मिसाल दिली जाते

Previous article

कवी ते पंतप्रधान – अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन प्रवासाचा आढावा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *