Royal politicsभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

आशिष देशमुख अखेर अधिकृतरीत्या कॉंग्रेसवासी !

0

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज ( बुधवारी ) काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस मुख्यालयात ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश करण्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. खासदार नाना पटोले यांच्यापाठोपाठ आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला विदर्भात खूप मोठा धक्का बसला आहे.

2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीलाच आशिष देशमुख यांनी ई-मेलच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. राजीनामा दिल्यानंतर वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या जाहीरसभेत व्यासपीठावर हजेरी लावल्याने आशिष देशमुख यांची काँग्रेस प्रवेश नक्की मानला जात होता. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मंचावर जाऊन भेट घेतली होती. 3 ऑक्टोबर रोजी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सोपवला होता.

Loading...

‘मी टू’मुळे महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल – शिवसेना आमदार

Previous article

अमित शहांच्या तीन तासांच्या मुंबई दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.