मुख्य बातम्या

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून…. राणे बंधूंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

0

आग्रा येथे ‘ ताज महल ‘च्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ भव्य असं मुघल संग्रहालय उभारण्यात येत आहे. १५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या संग्रहायलाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या संग्रहालयाबाबत उत्तर प्रदेश सरकारने आज महत्त्वाचा आणि शिवरायांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतला. हे संग्रहालय मुघलांच्या नावाने नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
यानिमित्ताने राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर त्यांचे आभार मनात आहेत तसेच या निर्णयाचे कौतुक करत आहेत. मात्र याच निर्णयावरून ठाकरे सरकारला विरोधकांकडून लक्ष्य केल जात आहे.याच वेळी राणे बंधूंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
‘आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून “छत्रपती शिवाजी महाराज” यांचं नाव देण्याचा स्तुत्य निर्णय उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ  सरकारने घेतला. महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तंस काही होईल वाटत नाही.’ असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून “छत्रपती शिवाजी महाराज” यांचं नाव देण्याचा स्तुत्य निर्णय उत्तर प्रदेशातील @myogiadityanath सरकारने घेतला. महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तंस काही होईल वाटत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 15, 2020

Loading...

तर दुसरीकडे नितेश राणे यांनी देखील ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.’ असं म्हणत ठाकरे सरकारवर हल्ला करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आहेत..आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजाकडे पुरावे मागतात..दुर्देव्य ते आमचे !
— nitesh rane (@NiteshNRane) September 15, 2020

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून…. राणे बंधूंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल InShorts Marathi.

Loading...

छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध

Previous article

कांदा निर्यातबंदीच्या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक ; राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय

Next article

You may also like

Comments

Comments are closed.