मुख्य बातम्या

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आहेत म्हणून.. ; राणे बंधूंचा ठाकरे सरकार जोरदार हल्लाबोल

0

आग्रा येथे ‘ ताज महल ‘च्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ भव्य असं मुघल संग्रहालय उभारण्यात येत आहे. १५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या संग्रहायलाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या संग्रहालयाबाबत उत्तर प्रदेश सरकारने आज महत्त्वाचा आणि शिवरायांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतला. हे संग्रहालय मुघलांच्या नावाने नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
यानिमित्ताने राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर त्यांचे आभार मनात आहेत तसेच या निर्णयाचे कौतुक करत आहेत. मात्र राणे बंधूंनी ठाकरे सरकारला या मुद्द्यावरून लक्ष्य करत निशाणा साधला आहे. नितेश राणेंनी यावेळी ठाकरे सरकारवर टीका करताना “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आहेत.. आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजाकडे पुरावे मागतात.. दुर्देव्य ते आमचे !” असे म्हटले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आहेत..आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजाकडे पुरावे मागतात..दुर्देव्य ते आमचे !
— nitesh rane (@NiteshNRane) September 15, 2020

Loading...

याच मुद्द्यावरून नीलेश राणे यांनी देखील मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत नीलेश राणे म्हणतात, ‘आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून “छत्रपती शिवाजी महाराज” यांचं नाव देण्याचा स्तुत्य निर्णय उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने घेतला. महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तंस काही होईल वाटत नाही.’
महत्वाच्या बातम्या :-

‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवारांनी केंद्राला खडसावले, म्हणाले ….
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !

 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्रात मुघल सत्तेत आहेत म्हणून.. ; राणे बंधूंचा ठाकरे सरकार जोरदार हल्लाबोल InShorts Marathi.

Loading...

योगी आदित्यनाथांचा तो निर्णय खरोखरच अभिमानास्पद ; उदयनराजेंनी मानले योगींचे आभार

Previous article

छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध

Next article

You may also like

Comments

Comments are closed.