Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

नाथाभाऊंच्या कामगिरीवर जनता खुश,मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वाढली

0

टीम महाराष्ट्र देशा-आमदार म्हणून माझी कामगिरी समाधानकारक असल्याचे सर्व्हेतून समोर आलंय, असा दावा माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. तसेच, जनतेला दिलेली आश्वासनं पाळल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे .माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.

दिल्लीतील ‘चाणक्य’ संस्थेच्या माध्यमातून भाजपने केलेल्या सर्व्हेमधून महाराष्ट्रातील भाजपच्या 6 खासदार आणि 50 आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचे समोर आले. खडसेंच्या कामगिरीबाबत जनता समाधानकारक ‘चाणक्य’च्या सर्व्हेतून जनतेला प्रश्न विचारण्यात आला की, “एकनाथ खडसे यांना पुन्हा आमदार बनवू इच्छित आहात का?” या प्रश्नाला 51 टक्के लोकांनी ‘होय’ असे उत्तर दिले, 41 टक्के लोकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले, तर 8 टक्के लोकांनी ‘माहित नाही’ असे उत्तर दिले. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याबाबत जनतेच्या मनात सकारात्मक मत असल्याचे दिसून येत आहे.

Loading...

दरम्यान,कामगिरी हा निकष भाजपने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कार्यक्षम आणि पक्ष संघटना वाढीला पूरक ठरतील अशा चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. दस-यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. नव्या मंत्रिमंडळात अनेक काही चेहरे समाविष्ट होणार असले तरी कार्यक्षमता या निकषावर काहीजणांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. यात लातूरचे संभाजी पाटील निलंगेकर, मुंबईच्या विद्या ठाकूर आणि विनोद तावडे यांचा समावेश असेल असे सूत्रांनी सांगितले. विस्तारासाठी नव्या मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठविण्यात आल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

दरम्यान,खडसे यांना परत मंत्री केले जाईल का या बाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांच्या समावेशाला भाजपा श्रेष्ठींनी अद्याप होकार दिलेला नाही,असे सूत्रांनी सांगितले. खुद्द मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा खडसेंना पुन्हा मंत्री करण्याचा आग्रह आहे. मात्र, खडसेंबाबत हायकमांड नाराज असल्याचे चित्र आहे.मात्र कामगिरी समाधानकारक असल्याचे सर्व्हेतून समोर आल्याने खडसे पुन्हा एकदा मंत्री होतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

या मंत्र्यांना दिला जाऊ शकतो डच्चू

फेरबदलात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, विद्या ठाकूर यांचा पत्ता कापला जाऊ शकतो. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे देखील डेंजर झोनमध्ये असल्याचं बोलले जात आहे.

या नेते मंडळींची लागू शकते मंत्रीपदी वर्णी

विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.विद्या ठाकूर यांना वगळून योगेश सागर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.

खडसे आक्रमक! गिरीश बापटांचे धाबे दणाणले

जळगाव भाजपच्या पोस्टरवर शिवसेना नेत्यानंतर एकनाथ खडसेंना जागा

Loading...

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार, ‘या’ मंत्र्यांचा होऊ शकतो पत्ता कट

Previous article

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे करणार जोरदार शक्तीप्रदर्शन !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.