Royal politicsटॉप पोस्ट

अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, आयएएस अधिकार्‍यांचा संप मागे घेण्याची मागणी

0

दिल्ली:- 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मागील काही दिवसांपासून दिल्ली ला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा यासाठी दिल्ली चे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करण्यासाठी बसले आहेत. त्यांच्या बरोबर आप चे नेते, सहकारी मनीष सिसोदिया, सतेंद्र जैन हे सुद्धा त्यांच्या बरोबर  धरणे आंदोलन करण्यासाठी बसले आहेत.

Loading...

आज सकाळी 7 वाजताच केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या मागण्यांबाबत ट्विट केले.

  • आयएएस अधिकार्‍यांनी आपला बंद मागे घ्यावा.
  • रेशन ची डोरस्टेप डिलीवरी लागू करावी.

काल 5 च्या सुमारास माजी केंद्रीय वित्त मंत्री यशवंत सिन्हा आप कडून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये समर्थकांना संबोधित करताना केंद्र सरकार ला इशारा दिला की,  दिल्ली काही सामान्य राज्य नाही, इथे होणार्‍या घटनेवर संपूर्ण जगाचे लक्ष असते. त्यामुळे इथले मुद्दे लवकरात लवकर सोडवण्यात यावे.

ममता बनर्जींचा आप आणि केजरीवाल यांना पाठिंबा –

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आप आणि केजरीवाल यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आणि केंद्राकडे ही समस्या सोडवण्याची मागणी केली. त्या असे म्हणल्या की, निवडून आलेल्या मुख्यमंत्रीला आदर मिळला पाहिजे. माझे केंद्र सरकार आणि दिल्ली चे नायब राज्यपाल यांना आवाहन आहे की त्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे.

अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  पत्र-  

याबाबत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली च्या प्रशासकीय अवस्थेबद्दल पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी हे मुद्दे मांडले आहे.

  • दिल्ली मध्ये भारतीय प्रशासकीत अधिकारी संपावर गेले आहेत. त्यांचा संप थांबवण्यासाठी नायब राज्यपाल  हे सहकार्य करीत नाहीत. केंद्र सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
  • आयएएस अधिकारी मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. यामुळे राजधानीच्या प्रशासनाकडे दुर्लक्ष होत आहे.
  • केवळ केंद्र आणि  नायब राज्यपाल हा   संप थांबवू शकतात.
  • दिल्ली शासन आणि दिल्ली चे नागरिक तुम्हाला विनंती करीत आहे की तुम्ही हा संप थांबवावा. म्हणजे आम्हाला पुन्हा आमचे काम करता येईल.

दिल्लीतील तरुणांचा, दिल्लीकरांचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवण्याच्या मुद्याला पाठिंबा मिळताना दिसतोय. तर काही ठिकाणी त्याच्या या मागणीला विरोध देखील केला जात असल्याचे समोर येत आहे.

Loading...

शाहरूखचा चाहत्यांना ईद का तोफा, झिरोचा टीझर रिलीज

Previous article

रद्द झालेल्या पासपोर्टने नीरव मोदी करतोय परदेश वाऱ्या

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *