टॉप पोस्ट

सुब्रमणियन लवकरच सोडणार आर्थिक सल्लागार पद

0

केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेले अरविंद सुब्रमणियन हे आपले पद लवकरच सोडणार असल्याचे समोर येत आहे. याबाबतचे ट्विट देखील त्यांनी केले आहे.

1-2 महिन्यात आपण पद सोडून अमेरिकेस परत जाणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये स्पष्ट म्हणाले आहे.

Loading...

कोण आहेत अरविंद सुब्रमणियम-

गेल्या 4 वर्षा पासून सुब्रमणियन हे केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांची 3 वर्षासाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आणखी 1 वर्षांसाठी त्यांची पदावर मुदतवाढ करण्यात आली होती. ही मुदतवाढ मे महिन्यात संपणार आहे.
जॅम म्हणजेच जनधन, आधार, मोबाइल या योजनेचा वापर करून लोकांना बँक खात्याशी जोडून घेऊन या योजनेचा वापर सार्वजनिक हितासाठी करून घेण्याची संकल्पना त्यांचीच.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर आधारित पहिला ऑनलाईन शिक्षणक्रम सुरू करत, त्यांनी देशभरातील अभ्यासक्रमांसाठी ‘स्वयं’ हे ऑनलाईन शिक्षण पोर्टल सुरू करण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला.

काँग्रेसकडून आरोप

मोदी सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापणाला कंटाळून अनेक अर्थतज्ज्ञ राजीनामे देत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

याआधी नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया हे देखील आपल्या पदावरून मुक्त होऊन अमेरिकेला निघून गेले होते.

अर्थमंत्री अरुण जेटली यांचे स्पष्टीकरण-

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असे सांगितले आहे की, सुब्रमणियन यांची माझ्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. कौटुंबिक जबाबदऱ्यांमुळे मला अमेरिकेला जाणे गरजेचे असल्यामुळे मला जबाबदारीतून मुक्त करावे असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी माझ्यापुढे कोणताही पर्याय न ठेवल्याने त्यांना जबाबदारीतून मुक्त केल्याशिवाय माझ्याकडे दूसरा पर्याय नाही. याबाबतचे पत्र अरुण जेटली यांनी आपल्या फेसबूक पेजवरून सुब्रमणियन यांना पोस्ट केले आहे.

आपल्या ट्विट मध्ये ते असा म्हणतात की, अर्थमंत्रालयाने मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. वैयक्तिक कारणांसाठी आणि काही संशोधनात्मक कामासाठी मी अमेरिकेत परत जात आहे. आर्थिक सल्लागार म्हणून मला मिळालेला अनुभव मला खूप समृद्ध करणारा आहे.

Loading...

जम्मू काश्मीरमध्ये 40 वर्षात 8 वेळा राज्यपाल राजवट लागू 

Previous article

डीएसके घोटाळ्यात वाढ, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांना अटक

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *