Royal EntertainmentRoyal politicsभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

#MeToo : नाना पाटेकरांच्या अटकेच्या मागणीसाठी कॉंग्रेस आक्रमक

0

मुंबई : टीम महाराष्ट्र देशा- हॉलिवूडमधून सुरू झालेली #MeToo मोहिम आता बॉलिवूडमध्येही पसरली आहे. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. #MeToo मोहिमेतंर्गत वेगवेगळया क्षेत्रातील महिला त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक जबरदस्तीच्या घटनांना वाचा फोडत असताना आताअभिनेत्री तनुश्री दत्ताच्या समर्थनात आता मुंबईतील महिला काँग्रेस उतरली आहे.

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अटकेची मागणी केली आहे. मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनबाहेर महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन नाना पाटेकर यांच्या अटकेची मागणी केली. अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर नाना पाटेकर यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाना पाटेकर ही भैया पुरस्कार स्पर्धेत सामील ; नानांना मनसे स्टाईलने प्रतिउत्तर

Loading...

#MeToo: ‘सेक्रेड गेम्स’च्या लेखकावर शोषण केल्याचा आरोप

Loading...

महादेव जानकरांनी दिली खा.उदयनराजे भोसले यांना ‘रासप’मध्ये येण्याची ऑफर

Previous article

पिंपरी : ‘शिवडे आय एम सॉरी’नंतर आता स्मार्ट बायका कुठे जातात ?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.