Royal Entertainmentमुख्य बातम्या

तोंडातील जंतूंचा नाश करते ‘सफरचंद’

0

पुणे – आजकाल सफरचंद हे बाराही महिने मिळणारे फळ आहे. सफरचंदांच्या अनेक जाती आहेत. काही लालसर तर काही गुलाबीसरही सफरचंद असतात. “रोज एक सफरचंद खा आणि डॉक्‍टराला दूर ठेवा.’ अशी ख्याती सफरचंदाची आहे. दरम्यान, असेच काही सफरचंद खाण्याचे आरोग्यदायी फायदे आज तुम्हाला सांगणार आहोत… 
सफरचंद हे चवीला आंबटगोड, ग्राही, पौष्टिक, पथ्यकारक, तृषाशामक, पित्त व वायूनाशक, संग्रहणी व आमांश दूर करणारे आणि आतड्यांना सुदृढ करणारे आहे. सफरचंदामध्ये असणारा “पॅक्‍टिन’ नावाचा घटक शरीरातील साठून राहिलेल्या कफाला पातळ करतो.
तसेच तो शरीरातील विषारी द्रव्ये नाहीशी करतो. पोटातील आम्लता कमी करतो. तसेच “पॅक्‍टिन’ मुळे हृदय, मेंदू, यकृत आणि जठर सुदृढ बनते. त्यामुळे भूकही चांगली लागते. रक्‍तातही वाढ होते.
सफरचंद चावून खाल्ली किंवा त्याचा रस प्यायला तरी चालतो. परंतु त्यातील घटकतत्वे अधिक प्रमाणात मिळवायची असल्यास सफरचंदाचा रस सेवन करावा. लहान मुलांना जुलाब होत असतील तर त्यांना सफरचंदांचा रस द्यावा. सफरचंदामध्ये रेचक हा गुण असून त्यामध्ये असणाऱ्या “पॅक्‍टिन’ मुळे जुलाब थांबण्यास मदत होते.
सफरचंदामुळे पोटातील तसेच आतड्यातील निरूपयोगी जिवाणूंचा नाश होतो. कावीळ, मूत्रपिंड तसेच यकृताच्या आजारातही सफरचंदाचा रस घ्यावा. आम्लतेमुळे होणाऱ्या सांधेदुखीच्या विकारात देखील सफरचंद उपयोगी आहे. सफरचंदाचा ताजा रस मधाबरोबर घेतल्यास तो अधिक पौष्टिक ठरतो.
मेंदू व ज्ञानतंतुंची दुर्बलता, मूतखडा, पोटातील आम्लता, अजीर्ण, डोकेदुखी, पित्तप्रकोप, दमा, आणि संग्रहणीमध्ये सफरचंद गुणकारी आहे. सफरचंद चांगले चावून खाल्ले असता त्यामध्ये असणाऱ्या आम्लतेमुळे दातात तसेच तोंडात असणाऱ्या जंतूंचा नाश होतो. म्हणूनच दातदुखीवर सफरचंद खाणं किंवा त्याचा रस पिणं हे एक औषध आहे.
The post तोंडातील जंतूंचा नाश करते ‘सफरचंद’ appeared first on Dainik Prabhat.

नेत्र आरोग्य : डोळ्यांचे आजार टाळण्यासाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा

Previous article

हार्दिक पांड्याच्या अगोदर हे 4 क्रिकेटर बनले होते लग्न न करताच वडील …

Next article

You may also like

Comments

Comments are closed.