Royal Entertainmentमुख्य बातम्या

अंकिता लोखंडेसाठी सुशांतने खरेदी केला होता करोडोंचा फ्लॅट, भरत होता EMI, आता अंकिताने उघड केले सत्य

0

सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला दोन महिने झाले आहेत. अभिनेत्याचे वडील केके सिंह द्वारे रिया चक्रवर्तीच्या विरुद्ध लिखित तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणामध्ये दररोज नवीन खुलासे होत आहेत. सुशांतच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार रियाने सुशांतला कंट्रोलमध्ये ठेवले होते आणि त्याचे पैसे हडप करण्याच्या प्रयत्नासोबत मानसिक रूपाने प्रताडीत केले.
५ करोडची बाब समोर आल्यानंतर ईडीने रिया चक्रवर्तीवर त्वरित मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. ईडीने रिया, तिचा भाऊ, वडील, अभिनेत्याची मॅनेजर श्रुति मोदीची चौकशी केली होती. ज्यामध्ये बरीच माहिती समोर आली होती. नुकतेच जी बातमी समोर आली कि सुशांत एका फ्लॅटचा हप्ता भरत होता आणि लाईफमध्ये तिसरी मुलगी असण्याची गोष्ट समोर आली होती. ती तिसरी मुलगी अंकिता लोखंडे आहे आणि तिने समोर येऊन सफाई दिली आहे.
अंकिता लोखंडेने केला खुलासावास्तविक जेव्हा फ्लॅटच्या हप्त्याची बाब समोर आली तेव्हा ईडीने त्याचा तपास केला. ज्यामध्ये हे उघड झाले कि मलाडमध्ये ४.५ करोड रुपयांचा एक फ्लॅट सुशांतने खरेदी केला होता. ज्याचा तो हप्ता भरत होता. मलाड फ्लॅट बद्दल असा रिपोर्ट्स समोर आला आहे कि हा तोच फ्लॅट आहे ज्यामध्ये अंकिता लोखंडे म्हणजे अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड राहत आहे.
अंकितासाठी अभिनेत्याने खरेदी केला होता फ्लॅटएका न्यूज वेबसाईटच्या रिपोर्ट्सनुसार मलाड स्थित या फ्लॅटला सुशांत सिंहने अंकिता लोखंडेसाठी खरेदी केले होते. ज्याची माहिती रिया चक्रवर्तीने ईडीच्या चौकशीदरम्यान दिली आहे. रियाने चौकशीदरम्यान सांगितले कि या फ्लॅटमध्ये अंकिता राहत होती आणि सुशांतची इच्छा असून देखील तो फ्लॅट खाली करण्यास सांगू शकत नव्हता. तर फ्लॅटचा हप्ता स्वतः सुशांत भरत होता. रिया द्वारे माहिती दिल्यानंतर अजूनपर्यंत हे स्पष्ट झाले नाही कि फ्लॅटची किती ईएमआय सुशांतने भरली होती आणि किती बाकी होती.
प्रत्येक महिन्याला कट होत होती ईएमआयईडीच्या चौकशीदरम्यान उघड झाले आहे कि सुशांतच्या खात्यामधून प्रत्येक महिन्याला फ्लॅटचा ईएमआय कट होत होता. आता प्रश्न हा येतो कि दोघे ६ वर्षाच्या रिलेशनशिप नंतर २०१६ ला वेगळे झाले होते. असे असून देखील सुशांत त्या फ्लॅटचा हप्ता भरत होता. याचे उत्तर आता स्वतः अंकिताने दिले आहे आणि संपूर्ण सत्य समोर आले आहे.
अंकिताने दिले सडेतोड उत्तर
फ्लॅट आणि ईएमआय बद्दल ज्यावेळी चर्चा होऊ लागली तेव्हा अंकिता लोखंडे जी सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये आपले मत व्यक्त करत आहे. तिने समोर येऊन पुरावा देखील दाखवला. अंकिताने इंस्टाग्रामवर पुरावा म्हणून आपल्या फ्लॅटच्या रजिस्ट्रीच्या कागदपत्राचा फोटो शेयर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, इथे मी सर्व चर्चांना पूर्णविराम देते. मी यापेक्षा अधिक स्पष्टपणे सांगू शकत नाही.

 

View this post on Instagram

 
Here i cease all the speculations.As transparent as I could be.My Flat’s Registration as well as my Bank Statement’s(01/01/19 to 01/03/20)highlighting the emi’s being deducted from my account on monthly basis.There is nothing more I have to say #justiceforssr
A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on Aug 14, 2020 at 11:29am PDT

इथे मी माझ्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशन आणि बँक खात्याचे (१ जानेवारी २०१९ ते एक मार्च २०२० पर्यंत) संपूर्ण डीटेल्स दाखवत आहे. माझ्या अकाऊंटमधून दर महिन्याला सर्व ईएमआईची अमाउंट कट होत आहे. मी यापेक्षा जात काही सांगू शकत नाही. सुशांतला न्याय मिळो. अंकिताने पुरावा दाखवल्यानंतर अभिनेत्याची बहिण श्वेता सिंह कीर्तीची प्रतिक्रिया समोर आली आहे आणि तिने लिहिले आहे, अंकिता तुझ्यावर गर्व आहे.
The post अंकिता लोखंडेसाठी सुशांतने खरेदी केला होता करोडोंचा फ्लॅट, भरत होता EMI, आता अंकिताने उघड केले सत्य appeared first on Yesमराठी.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या दोन महिन्यानंतर गाण्याद्वारे दिली गेली श्रद्धांजलि, भावूक करणारे आहे गाणे

Previous article

सुशांतच्या संपत्तीवर वडिलांचा दावा, मी त्याचा वारसदार आहे, सर्व काही माझे आहे, फक्त माझा हक्क

Next article

You may also like

Comments

Comments are closed.