Royal politicsटॉप पोस्ट

न्यूज 18, फर्स्ट पोस्ट, टाइम्स नाऊ, न्यू इंडियन एक्सप्रेस यांनी अमित शाह यांच्या ‘त्या’ बातमीबाबत घेतली माघार

0

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे ज्या सहकारी बँकेच्या संचालक पदावर होते त्या बँकेत नोटबंदीच्या दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या  500 आणि 1000 च्या  सर्वात जास्त नोटा जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर अनेक न्यूज मीडिया वेबसाइटने (मीडिया हाऊसेस) ही बातमी आपल्या वेबसाइट वर पोस्ट केली होती, परंतू काही वेळातच या बातम्या या वेबसाइट वरून या पोस्ट हटवण्यात आल्या.

न्यूज 18, फर्स्ट पोस्ट, टाइम्स नाऊ आणि न्यू इंडियन एक्सप्रेस या वेबसाइट आहेत ज्यांनी आजच टाकलेली ही बातमी लगेचच काढून टाकली.

Loading...

न्यूज 18, फर्स्ट पोस्ट  ह्या रिलायन्स इंडस्ट्रीज नेटवर्क 18 ग्रुपच्या मालकी  असलेल्या या मीडिया हाऊसेस ने आपल्या वेबसाइवर टाकलेल्या या बातम्या सकाळी पोस्ट केल्या केल्याच काही वेळामध्ये काढून टाकल्या, याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले नाही.

भाजपच्या नेत्यांबाबतच्या टीका करण्यात आलेल्या बातम्या प्रकाशित केल्यानंतर काढून टाकण्यात आल्याची ही काही पहिली घटना नाही. या आधी टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स, डीएनए या मीडिया हाऊसेस बरोबर या आधी देखील घडल्या आहेत.

जुलै 2017 मध्ये, टाइम्स ऑफ इंडियाच्या अहमदाबाद आवृत्तीत मागील पाच वर्षांत भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या संपत्तीत “300%” वाढ झाल्याची एक बातमी,  पेपरच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आल्यानंतर लगेचच काही तासात काढून टाकण्यात आली.

सप्टेंबर 2017 मध्ये अशीच एक घटना पुन्हा  टाइम्स ऑफ इंडिया बरोबर घडली. टाइम्स ऑफ इंडियाच्या जयपूर आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ‘प्रधानमंत्री फसल विमा योजने’वर टीका करणारी एक बातमी देण्यात आली होती. त्यावेळी देखील बातमी प्रकाशित करण्यात आल्या नंतर लगेचच काढून टाकल्यात आली होती.

हे ही वाचा –

अमित शाह संचालक पदी असलेल्या बँकेत बंद झालेल्या नोटांचा सर्वात जास्त भरणा- RTI

माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात अजूनही बॅचलर ऑफ कॉमर्स कोर्स पूर्ण केलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर  डीएनएच्या छापील आवृत्तीत जुलै 29 रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. आणि हीच बातमी आउटलुक हिंदीच्या वेबसाइट वर देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतू कोणत्याही स्पष्टीकरणानंतर  ती बातमी वेबसाइट वरून काढून टाकण्यात आली होती.

आयएएनएस या न्यूज एजन्सी कडून ही बातमी पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आली असून, त्यांनी स्पष्ट केले आहे की, ही बातमी माहिती अधिकारा अंतर्गत मिळवण्यात आली असून ती सत्य आहे. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. आम्ही आमच्या बातमीवर ठाम आहोत. यात आम्ही कोणताही बदल करणार नाही.

इकॉनॉमिक टाइम्सकडून ही बातमी वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच त्यांच्याकडून या बातमीत बदल करून, अमित शाह यांचे नाव काढून टाकण्यात आले.

 

कॉंग्रेसकडून या बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करत ट्विट करण्यात आले आहे.

Loading...

भारतातील 70 % वापरण्यायोग्य पाणी प्रदुषित, दर वर्षी 2 लाख लोकांचा मृत्यू

Previous article

FIFA WC 2018 : इंजुरी टाईममध्ये केलेल्या गोलने ब्राजीलची कोस्टा रिकावर 2-0 ने मात

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *