Royal politicsमुख्य बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले भारताच्या प्रजासत्ताकदिनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण

0

येत्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येण्यास नकार कळवला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ट्रम्प यांच्या कार्यालयातून कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना एप्रिल महिन्यातच भारताकडून प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी ट्रम्प कार्यालयाकडून चर्चा करून उत्तर कळवू असे संगितले होते.

Loading...

परंतू अमेरिकेकडून ट्रम्प कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवत खेद व्यक्त केला आहे. 26 जानेवारीच्या दरम्यान ट्रम्प यांचे काही नियोजित कार्यक्रम असल्याचे पत्रात सांगण्यात आले आहे. 26 जानेवारीच्या आसपासच्या तारखेला ट्रम्प यांचा स्टेट ऑफ यूनियन (जनतेला संबोधन) चा कार्यक्रम आणि काही इतर कार्यक्रम अमेरिकेत असल्याचे कळवले आहे.

अमेरिकेने इराणकडून तेल घेण्यावर निर्बंध घातले असताना भारताने न जुमानता इराणबरोबर तेल आयातीचा करार केल्याने तसेच रशिया बरोबर एस 400 एअर डिफेंस मिसायल सिस्टिम करार केल्यामुळे भारत, अमेरिका संबंधात तणाव निर्माण झाला आहे.

याआधी भारत – अमेरिका झालेल्या चर्चेवेळी अमेरिकेचे संरक्षण मंत्री माईक पोंपियो म्हणाले होते की भारत प्रतिबंध टाळण्यासाठी 4 नोव्हेंबर च्या आधी इराणकडून तेल आयात करणे थांबवले.

असे असले तरी भारताने उत्तर दिले की भारत फक्त संयुक्त राष्ट्राने घातलेल्या बंधनांचेच पालन करेल. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी इराण मधील कंपन्यांना तेल आयात करण्याच्या ऑर्डर देखील दिल्या आहेत.

भारताने अमेरिकेला न जुमानत इराण, रशियाशी करार केल्याने दोन्ही राष्ट्रातील संबंध ताणले गेले आहेत.

Loading...

मंदिर मस्जिद की लढाई राम को फिर वनवास देगी…; ‘मोहल्ला अस्सी’चा हटके ट्रेलर रिलीज

Previous article

188 प्रवाशी घेऊन जाणारे इंडोनेशियाचे विमान कोसळले; जावा समुद्रात विमानाचा शोध सुरू

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *