Royal politicsटॉप पोस्ट

अलवर मॉब लिंचिंग : पोलिसांनी जखमी व्यक्तीला 6 किमी दूर हाॅस्पिटलमध्ये पोहचवण्यास लावले 3 तास

0

शुक्रवारी राजस्थानच्या अलवर येथे तथाकथित गौरक्षकांच्या जमवाने गौतस्करीच्या शंकेने 28 वर्षी रकबर खानवर हल्ला केला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.  त्यानंतर भाजप आमदार ज्ञानदेव आहूजा वकतव्य केले की, पिडिताचा मृत्यू हा घटनास्थळावर झालेला नसून, पोलिस कोठडीत असताना मारहाण केल्यामुळे झाला आहे.यानंतर पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्न उठण्यास सुरूवात झाली.

वेगवेगळ्या वृत्तांनुसार सुचना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळावर पोहचले. त्यानंतर जखमीला 6 किमी दूर असलेल्या हाॅस्पिटलमध्ये पोहचवण्यास पोलिसांनी तीन तास लावले. सांगण्यात येत आहे की, पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या दोन गायांना आधी 10 किमी दूर असलेल्या गोशालामध्ये पोहचवले. त्यानंतर जखमी रकबरला एक तासानंतर हाॅस्पिटलमध्ये पोहचवण्यात आले. हाॅस्पिटलमध्ये नेल्यानंतर तेथे त्याला मृत म्हणून घोषित करण्यात आले.

Loading...

एफआयआर नुसार, पोलिसांना घटनेची माहिती रात्री 1 वाजून 41 मिनिटांनी मिळाली. त्यांना ही माहिती एक गोरक्षक नवल किशोर शर्मा यांनी फोनवरून दिली होती. माहिती मिळताच 15-20 मिनिटात पोलिस घटनास्थळावर पोहचले. परंतू आता पोलिसांवर प्रश्न निर्माण होत आहे की, फक्त 6 किमी दूर असलेल्या हाॅस्पिटलमध्ये पोहचण्यास पोलिसांना 4 तास कसे लागले.

इंडियन एक्सप्रेसनुसार, पोलिस यादरम्यान काहीवेळ चहा पिण्यासाठी थांबले.

या हत्येनंतर राजस्थान सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. आतापर्यंत या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या घटनेवर काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि भाजपवर कठोर टिका केली. त्यांनी ट्विटर म्हटले की, अलवर पोलिसांनी जखमी रकबर खानला 6 किमी दूर असलेल्या हाॅस्पिटलमध्ये नेण्यास 3 तास का लावले. पोलिसमध्ये चहा-नाश्त्यासाठी थांबले.

राहुल गांधी म्हणाले की, हा मोदींचा क्रूर ‘न्यू इंडिया’ आहे. जेथे मानवता ही द्वेषामध्ये बदलली असून, लोकांना मारले जात आहे आणि मरण्यासाठी तसेच सोडले जाते. .

राजस्थानच्या डीजीपीने या घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ आधिकाऱ्यांची एक टीम नियुक्त केली आहे. ही टीम तपास करून याचा रिपोर्ट देईल.

हे ही वाचा – 

अलवर मॉब लिंचिंग: सुप्रीम कोर्टात 20 आॅग्सटला होणार सुनावणी

कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी कायदा बनवा – सुप्रीम कोर्ट

Loading...

या कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला विठ्ठलाच्या पूजेला जायचे टाळले, जाणून घ्या कारण

Previous article

पाकिस्तानच्या निवडणुकीत अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांची एंट्री

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *